कुठल्या युगात,कुठल्या शतकात,
कुठल्या काळात,सहिष्णु होता तुम्ही?
देवासुर संग्रामावेळी?
जेव्हा तुम्ही स्वतःच अमृत चाखले
आणि विष दिले सोडून
त्यांच्याकरिता,
जे नव्हते तुमच्याशी सहमत
दैत्य,दानव,असुर,किन्नर,यक्ष,राक्षस
काय काय नाही म्हटले गेले त्यांना
वध,मर्दन,संहार
काय काय नाही केले त्यांचे.
---------
तेव्हा होता तुम्ही सहिष्णु?
जेव्हा मर्यादा पुरुषोत्तमाने छाटले होते शंबुकाचे शीर.
घेतली होती पत्नीच्या चारित्र्याची परिक्षा आणि
तरिही सोडून दिले
गर्भवती सीतेला
एकटीच रानावनात.
की तेव्हा,जेव्हा
द्रोणाने दक्षिणेपोटी छाटून
टाकला होता
आदिवासी एकलव्याचा अंगठा,
जुगारात पणास लावून टाकली होती
पाच-पाच नवर्यांची बायको द्रोपदी
आणि टका मका बघत राहिले पितामह.
---------
किंवा तेव्हा,
तुम्ही सहिष्णु होता?
जेव्हा म्हणे ब्रह्मदेवाने बनवले
होते वर्ण
रचली होती उच्च-नीचतेने
भरलेली सृष्टी
कि तेव्हा,
जेव्हा विषमतेच्या जनकाने लिहिली होती
विषारी मनुस्मृती,
जिने बाईला फक्त भोगवस्तू बनवून टाकले
शुद्रांपासून हिरावण्यात आले होते
सकल अधिकार.
राहिली होती त्यांच्याजवळ
फक्त कर्तव्ये.
सेवा करणे हेच
त्यांचे जीवन उद्दीष्ट बनले होते
आणि अस्पृश्य ढकलले गेले
होते गावातल्या दक्षिण भागात.
लटकवण्यात आली होती गळ्यात मडकी
आणि पाठीवर खराटा
बाहेर पडू शकत होते ते फक्त
भर दुपारी रणरणत्या उन्हात म्हणजे त्यांची सावलीसुद्धा
पडू नये तुमच्यावर.
माणसाला अस्पृश्य बनवून
त्याच्या सावलीचाही मानलात विटाळ!
ही नव्हती का असहिष्णुता?
--------
अखेर तुम्ही कधी होता सहिष्णु?
परशुरामाकडून क्षत्रिय संहार झाला त्यावेळी की
बौद्धांच्या नरसंहारावेळी
की महाभारतकालीन युद्धावेळी
लंकादहन करताना
की खांडववन जाळताना
काही आठवतंय
शेवटचे कधी होता तुम्ही सहिष्णु?
-------
अस्पृश्यांचा वेगळा मतदानाचा
हक्क हिरावून घेताना
देशाच्या फाळणीवेळी
दंगलींच्या काळात
पंजाब,गुजरात,काश्मिर,पूर्वोत्तर,
बाबरी,दादरी,कुंभेर,जहानाबाद,
डांगावास आणि झज्जर
कुठल्या ठिकाणी तुम्ही
सहिष्णु होतात?
आदिवासी कार्यकर्ती
सोनी सोरी यांच्या गुप्तांगात
दगड कोंबताना,
सलवा जुडूम,ग्रीन हंट च्या नावाखाली
आदिवासींना मारताना,
लोकांच्या नद्या,जंगले
शेतशिवार हडपताना,
अखेर कधी होतात तुम्ही सहिष्णु?
डाॅ.दाभोलकर,
पानसरे अण्णा,
डाॅ.कलबुर्गी,
गौरी लंकेश
यांच्या खूनावेळी,
प्रत्येक विरोधी स्वराला
पाकिस्तानला पाठविताना,
फेसबुक,ट्विटर,व्हाटसअप
कुठल्या ठिकाणी होता तुम्ही सहिष्णु?
-------
प्राचीन युगात
गुलाम भारतात
स्वतंत्र देशात
मागील काळात आणि आजपर्यंतदेखील
कधी नव्हता तुम्ही
थोडेफारदेखील सहिष्णु
सहिष्णु असूच शकत नाही तुम्ही
कारण तुमची संस्कृती,साहित्य,कला,धर्म,मंदिर,
स्वयंपाकघर,शेत,गाव,घर
कुठे कुठेही दिसून येत नाही सहिष्णुता,
वास्तव तर हे आहे की तुमच्या
डीएनएमध्येच नाहीये
सहिष्णुता युगांयुगांपासून......
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
कब सहिष्णु थे आप ?
कौन से युग ,किस सदी ,
किस कालखंड में ,सहिष्णु थे आप ?
देवासुर संग्राम के समय ?
जब अमृत खुद चखा
और विष छोड़ दिया
उनके लिए ,
जो ना थे तुमसे सहमत.
दैत्य ,दानव ,असुर ,किन्नर
यक्ष ,राक्षस
क्या क्या ना कहा उनको.
वध ,मर्दन ,संहार
क्या क्या ना किया उनका .
.......................
तब थे आप सहिष्णु ?
जब मर्यादा पुरुषोत्तम ने काट लिया था
शम्बूक का सिर .
ली थी पत्नी की चरित्र परीक्षा
और फिर भी छोड़ दी गई
गर्भवती सीता
अकेली वन प्रांतर में .
या तब ,जब
द्रोण ने दक्षिणा में कटवा दिया था
आदिवासी एकलव्य का अंगूठा .
जुएं में दांव पर लगा दी गयी थी
पांच पांच पतियों की पत्नि द्रोपदी
और टुकर टुकर देखते रहे पितामह .
...............
या तब थे आप सहिष्णु ?
जब ब्रह्मा ने बनाये थे वर्ण
रच डाली थी ऊँच नीच भरी सृष्टि.
या तब ,जब विषमता के जनक ने
लिखी थी विषैली मनुस्मृति .
जिसने औरत को सिर्फ
भोगने की वस्तु बना दिया था .
शूद्रों से छीन लिए गए थे
तमाम अधिकार .
रह गए थे उनके पास
महज़ कर्तव्य .
सेवा करना ही
उनका जीवनोद्देश्य
बन गया था .
और अछूत
धकेल दिये गए थे
गाँव के दख्खन टोलों में .
लटका दी गई थी
गले में हंडिया और पीठ पर झाड़ू
निकल सकते थे वे सिर्फ भरी दुपहरी .
ताकि उनकी छाया भी ना पड़े तुम पर .
इन्सान को अछूत बनाकर
उसकी छाया तक से परहेज़ !
नहीं थी असहिष्णुता ?
.................
आखिर आप कब थे सहिष्णु ?
परशुराम के क्षत्रिय संहार के समय
बौद्धों के कत्लेआम के वक़्त
या महाभारत युद्ध के दौरान .
लंका में आग लगाते हुए
या खांडव वन जलाते हुये .
कुछ याद पड़ता है
आखिरी बार कब थे आप सहिष्णु ?
..............................
अछूतों के पृथक निर्वाचन का
हक छीनते हुए ,
मुल्क के बंटवारे के समय
दंगों के दौरान ,
पंजाब ,गुजरात ,कश्मीर ,पूर्वोत्तर ,
बाबरी ,दादरी ,कुम्हेर ,जहानाबाद
डांगावास और झज्जर
कहाँ पर थे आप सहिष्णु ?
सोनी सोरी के गुप्तांगों में
पत्थर ठूंसते हुए .
सलवा जुडूम ,ग्रीन हंट के नाम पर
आदिवासियों को मारते हुए .
लोगों की नदियाँ ,जंगल ,
खेत,खलिहान हडपते वक़्त .
आखिर कब थे आप सहिष्णु ?
दाभोलकर ,पानसरे ,कलबुर्गी के
क़त्ल के वक़्त .
प्रतिरोध के हर स्वर को
पाकिस्तान भेजते वक़्त
फेसबुक ,ट्वीटर ,व्हाट्सएप
किस जगह पर थे आप सहिष्णु ?
......
प्राचीन युग में ,
गुलाम भारत में
आजाद मुल्क में
बीते कल और आज तक भी
कभी नहीं थे आप कतई सहिष्णु .
सहिष्णु हो ही नहीं सकते है आप
क्योंकि आपकी संस्कृति ,साहित्य ,कला
धर्म ,मंदिर ,रसोई ,खेत ,गाँव ,घर .
कहीं भी नहीं दिखाई पड़ती है सहिष्णुता
सच्चाई तो यह है कि आपके
डीएनए में ही नहीं है
सहिष्णुता युगों युगों से ......
©भंवर मेघवंशी
Bhanwar Meghvanshi