आम्ही उभे नाही राहू शकलो

आम्ही उभे नाही राहू शकलो

आम्ही उभे नाही राहू शकलो

आम्ही वाकून चालणारी प्रजा होतो
आम्हांवर सरळ छातीठोकपणे चालण्यावर 
बंदी घालण्यात आली होती,
गावातला सावकार वाईट 
वाटून घेईल म्हणून

आम्ही वाकलेले 
मागे मागे चालण्याच्या सवयीचे बनलो
कारण आघाडीचे भय वाटायचे
पिछाडीवर राहिलो नेहमीच

आम्ही 
छातीठोकपणे उभेही राहिलो जरी
तेव्हाही आम्हांला वाकायचे होते
सॅल्यूटच्या मुद्रेत
समोरच्याची प्रतिष्ठा टिकून राहावी
यासाठी,
हेच गरजेचे होते

आम्ही उभे नाही राहू शकलो
कारण आम्हांला वाकायचे होते
ईश्वर,सत्ता आणि 
भांडवलदार धनदांडग्यांपुढे
आम्हांला कुठल्याही शिक्षणात 
आपल्या अस्तिवाच्या बळावर 
उभे राहाणे
शिकवले गेले नव्हते
आम्हांला सांगितले गेले की
फळवंत वृक्ष हे वाकलेले असतात
हे खरेतर एक अर्धसत्य विधान होते
आम्ही फळवंत नसतानाही
फळवंत असल्याचा भ्रम घेऊन वाकलेले राहिलो
आणि काटेरी खुरट्या झुडूपात 
बदलून गेलो

आमच्या वाकलेल्या पाठीवर
ओझे लादले गेले
आम्ही ओझी वाहणारे 
सर्वात उपयुक्त 
सजीव होतो
आम्ही ओझ्यावर आणखी ओझे लादणार्‍यांपुढे सुद्धा वाकून राहिलो
आम्ही बोलू नाही शकलो
की कंबर मोडून जाईल
ओझे कमी करा सरकार

आम्ही वाकलेल्या समाजातले सरपटणारे लोक
पाठीचा कणा ताठ असणार्‍यांवर
हसत राहिलो
की एकटा बघा
आखडलेल्या झाडासारखा कोसळून पडेल एक दिवस
आम्ही कणाहीन लोक होतो
कणा शाबूत असलेल्यांशी 
आमचे गुण जुळत नव्हते
आम्ही लाचारी,
हुजरेगिरी,
शेपूटहलवेपणात 
आयुष्य शोधत 
हात जोडून वाकलेले राहिलो

जर का
आम्ही उभे राहू शकलो असतो
तर उभे असलेल्या लोकांसोबत 
उभे असतो
मग उभे राहाण्याची ताकद समजली
असती

समजले असते
की ज्यांच्यापुढे आम्ही वाकलो होतो
ते तर आमच्यापेक्षा खुजे लोक होते

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

हम खड़े नहीं हो सके 

हम झुक कर चलने  वाली प्रजा  थे 
हमे सीधा तनकर चलने से मना किया गया था 
कि गाँव का ठाकुर बुरा मान जाएगा 

हम झुके हुए  पीछे चलने के आदि रहे
कि अगाड़ी से डर लगता था 
पिछाड़ी रहे हर वक्त 

हम 
तनकर  खड़े भी हुए अगर 
तब भी हमे झुकना था 
सलूट की मुद्रा में 
कि सामने वाले का अदब बना रहे ,
यही जरूरी था 

हम खड़े नहीं हो सके 
क्योंकि हमे झुकना था 
ईश्वर, सत्ता, पूंजीपति के आगे 
हमे किसी भी शिक्षा में 
अपने वजूद पर खड़ा होना नहीं सिखाया गया था 
हमे बताया गया कि फलदार वृक्ष झुके रहते हैं 
यह जबकि एक अर्थसत्य वाक्य था 
हम फलदार न होते हुए भी 
फलदार होने का भ्रम लिए झुके रहे 
और झाड़-झंखाड़ में बदल गए 

हमारी झुकी पीठ पर 
बोझा लादा गया 
हम बोझा ढोने  वाले सर्वाधिक उपयुक्त जीव  थे 
हम बोझ पर और बोझा लादने वाले के सामने भी झुके रहे 
हम  बोल नही सके 
कि कमर टूटती जाती है 
बोझा कम  करिये सरकार 

हम झुकी हुई कौम के रेंगते हुए लोग 
रीढ़ वालो पर हँसते रहे
कि अकेला देखो 
अकड़े पेड़ सा गिर जाएगा किसी दिन 
हम बिना रीढ़ वाले लोग थे 
रीढ़ वालों से हमारी तासीर नहीं मिलती थी 
हम चिरौरी चापलूसी दुमकारी  में जीवन तलाशते
हाथ जोड़े झुके रहे 

काश ! कि हम खड़े होते
 कि खड़े लोगो के साथ खड़े होते 
कि  खड़े होने की शक्ति जानते 

जानते
कि जिनके सामने हम झुके थे 
वे तो हमसे बौने लोग थे 

©वीरेंदर भाटिया
Virender Bhatia 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने