गाढ झोपेत मी
एका अशा दृष्यात जाऊन पोहोचले
जिथे नरेंद्र मोदी
मानवतेच्या सुंदर भविष्यावरची
एक दीर्घ कविता वाचत होते,
अमित शहा एक ऐतिहासिक कादंबरी
लिहित होते,
योगी आदित्यनाथ चितारत होते चित्र,
मोहन भागवत तत्वज्ञानाच्या चर्चेत मग्न होते,
कुणी शंकराचार्य क्वांटम भौतिकशास्त्र शिकवीत होते
आणि तमाम साहित्यिक-कलावंत तसेच बुद्धीवंत जे जनता,समाजवाद इत्यादींना समर्पित होते,
देवीच्या जागरणात भजन गात होते,
किंवा पं.दीनदयाळ उपाध्याय यांची
एकात्मिक मानवतावादाची सूत्रे पाठ करीत होते,
किंवा दारूचा गुत्ता चालवित होते,
किंवा विमा एजंट वा शेयर बाजाराचे
दलाल बनले होते,
किंवा कंत्राटदार वा प्राॅपर्टी डिलरचे काम करीत होते,
किंवा ब्राह्मण महासभा आणि क्षत्रिय महासंघाच्या संमेलनांच्या अध्यक्ष मंडळात आणि स्वागत समित्यांमध्ये
समाविष्ट झाले होते,
वा हरिद्वारमधील पंड्यांच्या टोळीत जाऊन मिसळले होते,
किंवा काशी वा मथुरेत कारसेवा करणार्यांची यादी तयार करीत होते,
किंवा हातात रक्ताने माखलेला चाकू घेऊन मानवता आणि न्याय आणि स्वप्नांचा पाठलाग करीत असलेल्या गर्दीला रस्त्याच्या बाजूला तंबू उभारून चहापाणी करीत होते!
जे त्यांच्यात सहभागी नव्हते
ते वेड्याच्या इस्पितळात कोंडले गेले होते किंवा
त्यांनी आत्महत्या केली होती!
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
दुस्स्वप्न दृश्य (चार)
गहरी नींद में मैं
एक ऐसे दृश्य में जा पहुँची
जहाँ नरेन्द्र मोदी
मनुष्यता के सुन्दर भविष्य के बारे में
एक लम्बी कविता पढ़ रहे थे,
अमित शाह एक ऐतिहासिक उपन्यास
लिख रहे थे,
योगी आदित्यनाथ पेन्टिंग कर रहे थे,
मोहन भागवत दार्शनिक विमर्श में तल्लीन थे,
कोई एक शंकराचार्य क्वांटम भौतिकी पढ़ा रहे थे
और तमाम साहित्यकार-कलाकार और बौद्धिक जन
जो जनता, समाजवाद आदि को समर्पित थे,
जगराता में भजन गा रहे थे,
या पं. दीनदयाल उपाध्याय के
एकात्म मानववाद के सूत्र रट रहे थे,
या दारू की भट्ठी चला रहे थे,
या बीमा एजेंट या शेयर बाज़ार के
दलाल बन चुके थे,
या ठेकेदार या प्रापर्टी डीलर का काम
कर रहे थे,
या ब्राह्मण महासभा और क्षत्रिय महासंघ के
सम्मेलनों के अध्यक्ष-मण्डल और स्वागत समितियों में
शामिल हो गये थे,
या हरिद्वार के पंडों की जमात में जा मिले थे,
या काशी या मथुरा में कारसेवा करने वालों की
सूची बना रहे थे,
या हाथ में ख़ून सना चाकू थामे
मनुष्यता और न्याय और सपनों का
पीछा कर रही भीड़ को
रास्ते किनारे टेण्ट लगाकर
जलपान करा रहे थे!
जो उनमें शामिल नहीं थे
वे पागलखानों में बंद थे
या आत्महत्या कर चुके थे!
©कविता कृष्णपल्लवी
Kavita Krishnapallavi