मला आजोबांनी अडवलं,
वडिलांनी अडवलं
फक्त मायनंच
कधी कुठल्या गोष्टीसाठी अडवलं नाही
ती एकटीच माझ्यासोबत आहे
मी दीर्घकाळ हेच समजत राहिले
अनेक वर्षांनंतर एके संध्याकाळी मला
शंका आली
कुणी सोबत आहे तर मग गप्प का आहे?
मी तिला पहिल्यांदा विचारलं
माय,तू मला का कधी अडवलं नाहीस?
काय सहमत असण्याचा अर्थ
गप्प राहाणं असतो?
ती पहिल्यांदाच काहीतरी बोलली
तुझे आजोबा फारच कठोर होते
त्यांच्यासमोर मी कधी तोंड नाही उघडले
तुझे वडिलही फारच कठोर होते
त्यांच्यासमोर मी कधी तोंड नाही उघडले
मी आयुष्यभर तुलाही काही म्हणाले नाही
कारण मी कधीही
प्रश्न विचारायलाच शिकले नाही.
( जगाकडे कधी-कधी स्त्रियांच्या
दृष्टिकोनातूनही पाहायला हवं...)
मूळ हिंदी कविता
जसिंता केरकेट्टा
Jacinta Kerketta
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav