काही लोक

काही लोक

काही लोक

काही लोक म्हणाले,
जे काफिर आहेत
ती माणसं नाहीत

काही लोक म्हणाले,
जे अस्पृश्य आहेत
ती माणसं नाहीत

काही लोक म्हणाले,
कृष्णवर्णीय जे आहेत
ती माणसं नाहीत

काही लोक म्हणाले,
जे सुन्नी आहेत
ती माणसं नाहीत

काही लोक म्हणाले,
जे ज्यू आहेत
ती माणसं नाहीत

काही लोकांनी
खूप सार्‍या लोकांसाठी
नियम बनवले

काही लोकांनी
खूप सार्‍या लोकांचे
माणूसपण नाकारले

काही लोकांनी
याप्रमाणे
खूप सार्‍या माणसांच्या
हत्या करण्याकरिता
धर्म बनवले

मूळ हिंदी कविता
विरेंदर भाटिया
Virender Bhatia 

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने