पाणी/ स्त्रिया

पाणी/ स्त्रिया

पाणी/स्त्रिया

१)
भांड्याशिवाय वेगळे
कधी ओळखले जाईल
पाण्याला

पाण्याच्या नावाने.

२)
प्रेम तर
पाण्याने केले

रंगांनी तर

फक्त आपला
रंग दाखवला.

३)
जे रिकामे होते
पाण्याने

त्यांना खड्डे म्हटले गेले

आणि जे
भरलेले होते

ते सरोवर.

मूळ हिंदी कविता
नरेश गुर्जर 'नील'
Naresh Gurjar

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने