शेतकर्यांच्या पोरांनी
पुस्तकाचे पहिले पान उघडले
खूप वेळ पुस्तकात शोधले
आपल्या बापाला
मिस्त्रीचा पोरगा
हुडकत राहिला
मिस्त्रीला पुस्तकांमध्ये
जगातल्या सर्वात मोठ्या
महालांचा स्तंभांचा इतिहास
वाचताना
गवत कापणार्या बायांची पोरं
गवत कापणी करणार्यांना
शोधत राहिली
पर्वतांविषयक पुस्तकं वाचताना
नाभिकाची पोर
शोधत राहिली
कात्रीतून निघणार्या
चिमणीसारख्या आवाजासोबत
आपल्या वडिलाला
पुस्तकांमध्ये
सफाई कामगाराचे मूल
शोधत राहिले
एक साफ अणि स्वच्छ गोष्ट
की त्याचे बा का नाहीयेत पुस्तकांमध्ये
कोण यांना सांगेल की
हे जग निव्वळ
डाॅक्टर,इंजिनियर,
शिक्षक,प्राध्यापकांचे आहे
तहशीलदार,जिल्हाधिकारी यांचे आहे
यात मजूर,शेतकरी,नाभिक आणि
गवत कापणार्या बायकांसाठी कुठलीच जागा नाहीए.
माझ्या प्रिय मुलांनो,
ही पुस्तकं बदलायची आहेत
तुम्हाला!
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
किसान के बच्चों ने
किताब का पहला पन्ना
खोला
देर तक किताबों में ढूँढ़ा
अपने पिता को
मिस्त्री का बच्चा
ढूँढ़ता रहा
मिस्त्री किताबों में
दुनिया के सबसे बड़े महलों
मीनारों का इतिहास
पढ़ता हुआ
घस्यारिन के बच्चे
घस्यारिने ढूँढ़ते रहे
पहाड़ों के बारे में पढ़ते हुए
किताबों में
नाई की बच्ची
ढूँढ़ती रही
क़ैंची से निकलती
गौरैया-सी आवाज़ के साथ
अपने पिता को
किताबों में
सफ़ाईकर्मी
का बच्चा ढूँढ़ता रहा
एक साफ़-सुथरी बात
कि उसका पिता क्यों नहीं है किताबों में
कौन इन्हें बताए
यह दुनिया केवल
डॉक्टर, इंजीनियर, मास्टर, प्रोफ़ेसरों की है
तहसीलदार, ज़िलाधीशों की है
इसमें मजूरों, किसानों,
नाई और घस्यारिनों की कोई जगह नहीं
मेरे प्यारे बच्चो,
ये किताबें बदलनी हैं तुम्हें!
©अनिल कार्की
Anil Karki