ज्यांनी सत्यासाठी लढणे अपेक्षित होते
ते असत्यासोबत उभे राहिले
जे अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी
निघाले होते
ते अत्याचार्यांसह संघटीत झाले
जे हातात कुदळी घेऊन निघाले होते
ते धर्माचे झेंडे फडकवू लागले
ज्यांचे सूर बेसूर झाले होते
ते वंदेमातरम गायला लागले
ज्यांना नवजाणिवांच्या दिशेने
जायचे होते
ते इतिहासाच्या काळोखात
फडफडत असलेल्या वटवाघळांच्या शोधार्थ उतरले
उंदरांमध्ये परावर्तित होत चाललेले लोक
राष्ट्रवादाच्या दातांनी देश कुरतडायला लागले
जादूगार आनंदी आहे
त्याला माहित आहे उंदरांबाबत
संमोहनाची बासरी वाजवीत
उंदरांना नदीत बुडवण्याचे कौशल्य
दंतकथांमधून आधीच नोंदवून ठेवले गेलेय.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
बाज़ीगर
जिन्हें सच के लिये लड़ना था
वे झूठ के साथ खड़े हो गए
जो अन्याय का प्रतिकार करने निकले थे
वे अत्याचारियों के साथ लामबद्ध हो गए
जो हाथों में कुदालें लेकर चले थे
वे धर्मध्वजा फहराने लगे
जिनके सुर बेसुरे हो गए थे
वे वंदे मातरम गाने लगे
जिन्हें नई चेतना की ओर जाना था
वे इतिहास के अंधेरों में फड़फड़ाती
चमगादड़ों की खोज में उतर गए
चूहों में तब्दील होते लोग
राष्ट्रवाद के दांतों से देश को कुतरने लगे
बाजीगर खुश है
वह जानता है चूहों के बारे में
सम्मोहन की बांसुरी बजा कर
चूहों को नदी में डुबा देने का कौशल
दन्तकथाओं में पहले से ही दर्ज़ है.
©राजहंस सेठ
Rajhans Seth