अजूनही खाऊ घातली जाते भाकर
आणि प्यायला दिलं जातं पाणी
आम्हा अडाण्यांच्या गावात.
माझ्या माय ला तर
आजही देशाचे नावदेखील
ठाऊक नाहीए
पण कुठल्याही आल्या गेलेल्याला
ती परकं समजत नाही
आमची घरं खूप दूर दूरवर असतात
पण हृदयांमध्ये अंतर असत नाही
एकाच्या दुःखात
सगळी रडत असतात
आम्हा अडाण्यांच्या गावात.
तसे तर रीती रिवाज,परंपरा
इथे सगळे पाळतात
नदीला बहिणाई म्हणतात
आणि पर्वताला भाऊराया
धान आणि पावसाला जीवन म्हणतात
धरणीला माय आणि
नभाला बा म्हणतात
पण आजही माणसाला
माणूसच म्हणतात
आम्हा अडाण्यांच्या गावात.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
हिंदी अनुवाद
मालिनी गौतम
Malini Gautam
अनपढ़ों का मेरा गाँव
अभी भी खिलाई जाती है रोटी
और पिलाया जाता है पानी
हम अनपढ़ों के गाँव में
मेरी माँ को तो
आज भी देश का नाम तक नहीं पता
लेकिन किसी भी आने वाले को
वह पराया नहीं समझती
घर हमारे बहुत दूर- दूर होते हैं
लेकिन दिलों में दूरी नहीं होती
एक के दुख में
सब रो पड़ते हैं
हम अनपढ़ों के गाँव में
यूँ तो रीति- रिवाज, रस्म-पूजा
यहाँ सब करते हैं
नदी को बहन कहते हैं
और पहाड़ को भाई
धान और बरसात को जीवन कहते हैं
धरती को माँ और बादल को पिता कहते हैं
लेकिन आज भी इंसान को इंसान ही कहते हैं
हम अनपढ़ों के गाँव में।
मूळ गुजराती कविता
©जितेंद्र वसावा
Jitendra Vasava