ही नदी आमची आहे
जंगल आजकाल
खुल्या तुरुंगासारखं झालंय
जिथं हवा तर आहे
पण प्रश्न गायब आहेत
इथं काही विचारणं
एक मोठा गुन्हा आहे
आणि काही बोलणं
एक प्रकारचा राजद्रोह
शिक्षा म्हणून
मारले जाताहेत असे लोक
जे सर्वात कमी,पण
महत्त्वाचं बोलत असतात,
जसे
ही नदी आमची आहे
हा डोंगर आमचा आहे.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
जंगल इन दिनों
खुली जेल की तरह है
जहाँ हवा तो है
मगर सवाल गायब हैं
यहाँ कुछ पूछना
एक बड़ा अपराध है
कुछ कहना एक तरह का
राजद्रोह
सजा के तौर पर
मारे जा रहे हैं वे लोग
जो सबसे कम जरूरी बातें करते हैं
जैसे, यह नदी हमारी है
यह पहाड़ हमारा है।
©Poonam Wasam
पूनम वासम