आजकालच्या ओव्या

आजकालच्या ओव्या

आजकालच्या ओव्या!
🇮🇳
राष्ट्रपित्याहूनी थोर आता माफीवीर
संविधानवादी जनतेचा सुटू पाहे धीर
संघप्रचारकाच्या हाती तिरंग्याचा दोर
लाल किल्ल्यावर!

शहिदांचे गेले गेले व्यर्थ बलिदान
देशास्तव कितीकांनी केले प्राणार्पण
पण,पोस्टरवर पेन्शनखोर ठरे महान,
सांप्रतकाळी!

घाऊक मतचोरी केली आले सत्तेवर
संवैधानिक संस्था बनविल्या लाचार
मिडियाला मिंधे केले,झालेला प्रकार
अभुतपूर्वच!

घडविल्या कृत्यांची खंत नाही कोणा
लोकशाहीद्रोही झुंडीचा हा महागुन्हा
रेशीमबागछाप गांडाळांचा पुनःपुन्हा
देशावर वार!

फिरंग्याहून क्रूर अगा आज सत्ताखोर
गोरगरीब जनतेला ना कुणाचा आधार
बलात्कारी मुक्त,पडे निष्पापाला मार
अंध कायद्याचा!

सनदशीर मार्गाचा ना उरला उपचार
उडून घाली लाथा खाकीतला मुजोर
न्यायासाठी भरवसा ठेवावा कुणावर
जनतेने आता!

चापलुसी-उन्मादाला सत्ता देते बळ
कुणी काय खावे यावर निर्बंध बाष्कळ
राज्यशकट हाकणारांची मुर्ख पिलावळ
निर्ढावली असे!

मनुवादी मानसिकतेचा देशात सुकाळ
अल्पसंख्य,वंचितांची थांबेना आबाळ
चातुर्वर्ण्य अ-व्यवस्थेची दुष्ट चुळबूळ
संघमुर्दाडांची!

पंधराशेची भीक आणि अब्रुची लक्तरे
आयाबहिणींसाठी बंद शासनाची दारे
जातीवाचक शिवीगाळीचे प्रकार सारे
माजोर्डेपणाचे!

किडलेली सडलेली यंत्रणा सगळी
शोषणव्यवस्था शोषितांच्या भाळी
अप्पलपोट्यांची ही थोतांड साखळी
संपणार कधी?
🇮🇳
©भरत यादव
Bharat Yadav
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने