सत्यशोधकी ओव्या

सत्यशोधकी ओव्या

सत्यशोधकी ओव्या!
🚩
अगा कुत्र्या-डुकरांच्या अवलादी
इतक्या पिसाळल्या नव्हत्या कधी
धार्मिकद्वेषाची घृणास्पद दुर्गंधी
पसरवती!

माणुसघाणे ते कितीक निपजले
बेगडी प्राणीप्रेमाने जे अंध झाले
त्यांचे माणसांशी काही नाही उरले
सोयरसुतक!

शेकडो कबुतरे मस्तकी शिटती
कुत्री-मांजरे स्वैर अंगाला झटती
डुक्करपूजा ऐसी प्रस्थापित करती
धर्मकार्यापरी!

वराहपूजनाचे उभे गल्लोगल्ली ठेले
तृतीय अवताराची महा-महती चाले
डुक्करपण त्यांच्यातले बाहेर आले,
सांप्रतकाळी!

सौहार्दाचे हाडवैरी समाज नासविती
पोटार्थी भेत्रटांना मग हाग्या दम देती
पाहा पाहा कर्मठांची घोर अधर्मनीती
संघप्रेरीत!

वराहजयंत्युत्सवाचा घातलासे घाट
खुज्या मनोवृत्तीची खुनशी खटपट
सत्ताखोर पुढार्‍यांचा निवडणूक स्टंट
किळसवाणा!

घाणीत लडबडण्याची शिकावी तर्‍हा
इथे-तिथे चराचरी फक्त तिरस्कार पेरा
डुकरांसारखीच आता हागणदारी चरा
वराहप्रेमींनो!

वराहपूजनाचा ऐसा अभुतपूर्व थाट
दुमदुमला शंखध्वनी,त्रिखंडी बोभाट
पुरोहितवर्गाने साधली यथासांग लूट
धर्ममान्यतेने!

कलीयुगी नमोकाळाचा महिमा
मराठीमुलूखी फडणविसी ड्रामा
उन्मादखोरीची झाली परिसीमा,
असहनीय!

नेपाळची डुकरावळ पोसतो कोकण
शहाण्णवकुळीन सरंजामी फणफण
वराहजयंतीचा तुच्छ मुहूर्त साधून,
धोपटले असे!
🚩
©भरत यादव
Bharat Yadav
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने