क्षमा करणार नाही !
महात्मा बुद्धांना कुणीतरी
शिवी हासडली
त्यांनी त्या व्यक्तीच्या
शिव्यांना परत केले
असे सांगून की
या त्यांच्या उपयोगाच्या नाहीत
त्याने त्या आपल्याजवळ ठेवाव्यात!
महात्मा गांधींना कुणीतरी शिव्यांनी
भरलेले पत्र लिहिले
गांधींनी पत्राच्या काही पानांना
जोडणार्या टाचण्या आपल्यापाशी ठेवल्या
आणि
शिव्यांचे पत्र त्यालाच परत धाडले
म्हणाले,
या टाचण्या कामाच्या आहेत!
आणि
चांगल्या टाचण्या पाठविल्याबद्दल
आभार पण मानले गांधीजींनी.
बुद्ध आणि गांधी किती भोळसट होते
तिरस्काराचा एक सुपीक उद्योग सुरू न करून
देशाचे मोठे नुकसान केलेय!
अशा भोळसट
व्यापारी वृत्तीसाठी
देश बुद्ध आणि गांधी यांना
क्षमा करणार नाही!
नाही करणार!!
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
देश बुद्ध और गांधी को
क्षमा नहीं करेगा!
महात्मा बुद्ध को किसी ने गाली दी
उन्होंने उस व्यक्ति की गालियों को लौटा दिया
यह कह कर कि ये उनके
काम की नहीं
वह अपने पास रखे!
महात्मा गांधी को किसी ने गालियों भरा पत्र लिखा
गांधी ने उस पत्र के कई पन्नो को
नत्थी करने वाले पिन को अपने पास रख लिया और
गाली वाली चिट्ठी उसे ही लौटा दी
कहा यह पिन काम की है!
और अच्छी पिन देने के लिए
आभार भी प्रकट किया गांधी ने।
गांधी और बुद्ध कितने नासमझ थे
घृणा का एक उर्वर उद्योग
नहीं लगा कर
देश का भारी नुकसान किया है!
ऐसी नासमझ
व्यापार बुद्धि के लिए
देश बुद्ध और गांधी को
क्षमा नहीं करेगा!
नहीं करेगा!!
©बोधिसत्व
Bodhi Sattva