संतुर आणि तबल्याची
ही अखेरची जुगलबंदी होती
शेवटची साथ-संगत
ही जुगलबंदी शाश्वत होती
याला मृत्यू काय रोखणार?
झाकिर हुसेन यांनी
खांदा दिला शिवकुमार शर्मा यांना
स्मशानापर्यंत
निभावले आपले वचन
जोवर राख नाही झाले
तोवर उभे राहिले
साहत राहिले
आ घा ता
वर
आ घा त
आपल्या हृदयाच्या तानपुर्यावर
संगीत केवळ वाद्ययंत्रांवरच
अवलंबून नाहीये
हा आत्म्याचा आर्त आवाज आहे
आता अंत कुठे?
जन्म-जन्मांतरापर्यंत होत राहील
जुगलबंदी !
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
संतूर और तबले की
यह आख़िरी जुगलबंदी थी
आख़िरी संगत
यह जुगलबंदी सनातन थी
मृत्यु उसे क्या रोकती
ज़ाकिर हुसैन ने
दिया काँधा शिवकुमार शर्मा को
मसानों तक
निभाया अपना वायदा
जब तक राख नहीं हो गया
तब तक खड़ा रहा
सहता रहा आ घा त
पर आ घा त
अपने दिल के तानपूरे पर
संगीत वाद्य यन्त्रों तक मुनहसर नहीं है
यह आत्मा की विकल पुकार है
अभी अंत कहाँ
जन्म-जन्मांतर तक होनी है जुगलबंदी !
©कृष्ण कल्पित
Krishna Kalpit