स्त्री जेव्हा प्रेम करते
तेव्हा पृथ्वी आपल्या कक्षेत थोडी अधिक गतीने
फिरायला लागते
स्त्री जेव्हा प्रेम करते
तेव्हा हे ब्रह्मांड थोडेसे प्रसरण पावते
स्त्री जेव्हा प्रेम करते तेव्हा
मुंग्या आपल्यापेक्षा दहापटीने मोठ्या
साखरेच्या दाण्याला पेलून वारूळापर्यंत
नेण्यात यशस्वी होतात
परंतू लवकरच ब्रह्मांड पुनश्च
आकुंचन पावायला लागते
पृथ्वी आपल्या कक्षेत मंद होत जाते
मुंग्यांचा कुठला जोर आता
दाण्यावर नाही पडत
स्त्रीचे प्रेम
संबंधांच्या काळोख्या विहिरीत निसटलेल्या
बादलीसारखे
बुडायला लागते
स्त्रीच्या हातामधून निसटायला लागतो
तिचा इतिहास आणि तिचे भविष्य
या प्रक्रियेची पुनरुक्ती केली जाते
अगणित वेळेस...
तरिही स्त्री प्रेम करायचे सोडत नाही
तिचे प्रेम दफन होत जाते
काळोख्या विहिरीत
प्रेमावर प्रेमाचे थरावर थर जमा
होत राहातात
जसे एकत्र होत असतात झाडावरून
झडलेली पाने एकाच्यावर एक
एका शतकापर्यंत...
आणि बनत असतात इंधन एका प्रदीर्घ काळानंतर...
अगदी तसेच थरावर थर एकत्र
स्त्रीचे प्रेम
एका दीर्घ अंधारयुगानंतर
बनत असतो विद्रोह
म्हणून,
स्त्री आता केवळ प्रेमच नाही करीत
प्रेमाला जिवंत राखण्याचा
हट्टसुद्धा करत असते,
म्हणून,
स्त्री आता केवळ प्रेमच नाही करीत
प्रेमासाठी जगाला सुंदर बनविण्याची
झटझोंबीदेखील घेत असते.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
स्त्री जब प्रेम करती है तो
पृथ्वी अपनी धुरी पर थोड़ा तेज़ घूमने लगती है
स्त्री जब प्रेम करती है तो
यह ब्रह्मांड थोड़ा फैल जाता है
स्त्री जब प्रेम करती है तो
चीटियाँ अपने से दस गुनी बड़ी शक्कर की डली ठेलकर
बिल तक ले जाने में कामयाब हो जाती है
लेकिन जल्द ही ब्रह्मांड फिर सिकुड़ने लगता है
पृथ्वी अपनी धुरी पर सुस्त होने लगती है
चीटियों का कोई जोर अब डली पर नहीं लगता
स्त्री का प्रेम
संबंधों के अंधेरे कुएं में छूट गयी बाल्टी सा डूबने लगता है
स्त्री के हाथ से फिसलने लगता है
उसका इतिहास और उसका भविष्य
यह प्रक्रिया दोहराई जाती है
अनगिनत बार...
फिर भी स्त्री प्रेम करना नहीं छोड़ती
उसका प्रेम दफ़्न होता जाता है
अंधेरे कुएं में
प्रेम के ऊपर प्रेम की परत दर परत इकट्ठा होने लगती है
जैसे इकट्ठा होती है पेड़ से गिरी पत्तियां एक के ऊपर एक सदियों तक...
और बन जाती है ईंधन एक लंबे समय बाद..
ठीक उसी तरह परत दर परत इकट्ठा स्त्री का प्रेम
एक लंबे अंधेरे समय बाद
बन जाता है बगावत
इसलिए, स्त्री अब महज प्रेम ही नहीं करती
प्रेम को ज़िंदा रखने की ज़िद भी करती है,
इसलिए, स्त्री अब महज प्रेम ही नहीं करती
प्रेम के लिए
दुनिया को सुन्दर बनाने की जद्दोजहद भी करती है....
©मनीष आझाद
Manish Azad