एक बोधकथा- कोंबडा

एक बोधकथा- कोंबडा

कोंबडा

एका माणसाने एक कोंबडा विकत आणला. 
एकेदिवशी त्याला तो कापण्याची इच्छा झाली, 
त्याला कोंबडा कापण्याचे निमित्त शोधायचे होते म्हणून तो कोंबड्याला म्हणाला,'तू उद्यापासून आरवायचे नाहीस,
नाहीतर मी तुला मारून टाकीन.

कोंबडा म्हणाला,'ठिक आहे,मालक
तुम्ही म्हणाल तसेच होईल!'
सकाळी,जेव्हा कोंबड्याच्या आरवण्याची वेळ झाली,मालकाने पाहिले की कोंबडा आरवत नाहीये,पण नेहमीप्रमाणे आपले पंख फडफडवतो आहे.

मालकाने पुढचा आदेश जारी केला की उद्यापासून तू आपले पंख फडफडवणार नाहीस,नाहीतर मी तुला मारून टाकीन.

दूसर्‍यादिवशी सकाळी,
आरवण्याच्या वेळी कोंबड्याने आदेशाचे पालन करीत आपले पंख फडफडवले नाहीत,पण सवयीचा गुलाम असल्याने त्याने आपली मान लांब केली आणि ती उंचावली.

मालकाने वैतागून पुढची आज्ञा जारी केली की उद्यापासून तुझी अशी मानसुद्धा हलायला नको.
दूसर्‍यादिवशी कोंबडा गुपचूप कोंबडी बनून शांत बसून राहिला आणि काहीच नाही केले!

मग मालकाने विचार केला हीसुद्धा मात्रा चालली नाही,
यावेळेस मालकाने पण असा काही विचार केला की जे प्रत्यक्षात कोंबड्यासाठी अशक्यच होते.

मालक बोलला,
उद्यापासून तुला अंडी घालावी लागतील, 
नाहीतर मी तुला मारणार!

आता कोंबड्याला आपले मरण स्पष्टपणे दिसायला लागले आणि त्यानंतर तो खूप रडला.
मालकाने विचारले,
'काय झाले?
मृत्यूच्या भयाने रडतोयस ना?
कोंबड्याचे उत्तर फारच सुंदर आणि
यथार्थ होते.

कोंबडा सांगायला लागला,
'नाही,मी यासाठी रडतो आहे की
अंडी न घालता मरण्याऐवजी मी आरवून मेलो असतो तर बरे झाले असते...
आरवणे ही माझी ओळख आणि अस्मिता होती,मी सगळ्या गोष्टींचा त्याग केला आणि तुमची प्रत्येक गोष्ट मान्य केली,पण ज्याचा ठाम निर्धारच ठार मारण्याचा असेल तर त्याच्यासमोर अशाप्रकारे शरणागत व्हायला नको होते!!

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी बोधकथा

एक आदमी एक मुर्गा खरीद कर लाया। एक दिन वह मुर्गे को मारना चाहता था, इसलिए उस ने मुर्गे को मारने का बहाना सोचा और मुर्गे से कहा, "तुम कल से बाँग नहीं दोगे, नहीं तो मै तुम्हें मार डालूँगा।" 

मुर्गे ने कहा, "ठीक है, सर, जो भी आप चाहते हैं, वैसा ही होगा !"
सुबह , जैसे ही मुर्गे के बाँग का समय हुआ, मालिक ने देखा कि मुर्गा बाँग नहीं दे रहा है, लेकिन हमेशा की तरह, अपने पंख फड़फड़ा रहा है। 

मालिक ने अगला आदेश जारी किया कि कल से तुम अपने पंख भी नहीं फड़फड़ाओगे, नहीं तो मैं वध कर दूँगा।

 अगली सुबह, बाँग के समय, मुर्गे ने आज्ञा का पालन करते हुए अपने पंख नहीं फड़फड़ाए, लेकिन आदत से, मजबूर था, अपनी गर्दन को लंबा किया और उसे उठाया। 

मालिक ने परेशान होकर अगला आदेश जारी कर दिया कि कल से गर्दन भी नहीं हिलनी चाहिए। अगले दिन मुर्गा चुपचाप मुर्गी बनकर सहमा रहा और कुछ नहीं किया। 

मालिक ने सोचा ये तो बात नहीं बनी, इस बार मालिक ने भी कुछ ऐसा सोचा जो वास्तव में मुर्गे के लिए नामुमकिन था।

मालिक ने कहा कि कल से तुम्हें अंडे देने होंगे नहीं तो मै तेरा वध कर दूँगा।

अब मुर्गे को अपनी मौत साफ दिखाई देने लगी और वह बहुत रोया।
मालिक ने पूछा, "क्या बात है?"
मौत के डर से रो रहे हो?
मुर्गे का जवाब बहुत सुंदर और सार्थक था।

 मुर्गा कहने लगा:
"नहीं, मै इसलिए रो रहा हूँ कि, अंडे न देने पर मरने से बेहतर है बाँग देकर मरता...
बाँग मेरी पहचान और अस्मिता थी ,
मैंने सब कुछ त्याग दिया और तुम्हारी हर बात मानी , लेकिन जिसका इरादा ही मारने का हो तो उसके आगे इस तरह समर्पण नहीं करना चाहिए था। 

कथाकारः 
अज्ञात
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने