मातृप्रेम आणि मातृभक्तीचा सहज
प्रत्यय देणारा माऊलीगौरव सोहळा
सा.चित्रलेखाचे संपादक मा.ज्ञानेश महाराव यांच्या कठोर विवेकवादी भूमिकेचा आणि विज्ञानवादी जीवनशैलीचा उगमस्त्रोत काय असेल? असा प्रश्न नेहमी पडायचा. शुक्रवारी मुंबईत मातोश्री सुशिला रामकृष्ण महाराव यांनी वयाच्या नव्वदीत लिहीलेल्या माझी गोष्ट या अनुभवकथनपर पुस्तकाचा प्रकाशनसोहळा पार पडला,त्यानिमित्ताने महाराव सरांच्या बौध्दिक जडणघडणीमागचे रहस्य माझ्यापुरतेतरी उलगडले.
जीवनात अविरतपणे संघर्षरत राहून आपले आणि आपल्या अपत्यांचे आयुष्य घडवणार्या उजळविणार्या माऊलीच्या कर्तबगारीला वंदन करण्यासाठी कौटुंबिक जिव्हाळ्याची माणसे या कार्यक्रमाला उपस्थित होती.शिक्षण आणि अनुभवातून मिळालेले ज्ञानसारच माझी गोष्ट मधून शब्दांच्या माध्यमातून वाचकांपुढे ठेवले आहे.महाराव परिवाराला माता सुशिला यांनी उभे केले,घडवले तसेच आता त्यांनाही मुलांचे भरभरुन प्रेम मिळते आहे,जे या प्रकाशन सोहळ्याच्या समारंभातही दिसून आले. निरंतर शिक्षण तसेच अध्यापनातून आलेला जगाकडे पाहण्याचा सजग दृष्टिकोन हाच तर माझी गोष्ट चा गाभा आहे.जन्मदाते जिवंत असतानाच त्यांचा कौतुक वा गौरव सोहळा साजरा होणे कसे महत्वाचे असते,त्यांच्या पश्चात पिंडदान,श्राध्दासारख्या थोंताडातून कर्मकांडीय कावळे पोसण्याचे धंदे करणे निरर्थक असते हेही या सोहळ्यातून मनावर ठसले.
ज्येष्ठ साहित्यिक मधुमंगेश कर्णिक,आमदार कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या समारंभास समस्त महाराव परिवार आणि त्यांच्यावर स्नेह करणारे अनेकजण हजर होते.
अजूनही तल्लख बुध्दी आणि खणखणीत आवाज शाबूत असलेल्या माऊली सुशिला महाराव यांनी आपल्या निरोगी व निकोप आयुष्याचे रहस्यही यावेळी सोप्या भाषेत कथन केले.देवधर्म व कर्मकांडपसार्याची निरर्थकता विशद करणारे, दैववादाला उघडपणे झिडकारणारे,जगणं सुंदर असल्याचा कानमंत्र देणारे कणखर विवेकी मन आणि निरोगी शरीर हीच माणसाची खरी संपत्ती असल्याचे ठामपणे सांगणारा सुशिला माऊलीचा जीवनानुभव ऐकून मी कृतार्थ झालो.
चांगले बोला,चांगले वागा आणि जगा हीच यशस्वी आयुष्याची त्रिसूत्री असल्याचेही त्यांच्या बोलण्यातून जाणवले. काळाच्या वाहत्या प्रवाहातही आपण आपले विचार निर्धारपूर्वक कसे जपावेत आणि त्याचा समाजात सुजननिर्मितीकरिताही कसा वापर व्हावा,याचे अनुभवकथनप्रात्यक्षिकच जणू माऊली सुशिला महाराव यांनी यावेळी सुस्पष्ट वाणीत श्रोत्यांपुढे मांडले.
भटीथोतांडांची उभीआडवी चिरफाड करण्याचे बाळकडू ज्या माऊलीकडून ज्ञानेश महाराव यांना मिळाले त्या माऊलीच्या परखड बोलीने मनमन रोमांचित झाले.मातृगौरवाचा हा अपूर्व सोहळा ज्या महाराव भगिनी आणि भावंडांनी जुळवून आणला त्यांना ह्रदयापासून धन्यवाद देतच उपस्थित सभागृहातून बाहेर पडत होते.माझी गोष्ट ची प्रत यावेळी प्रत्येकाला सप्रेम भेट म्हणून देण्यात आली. मातृभक्तीच्या रसात रसिकमनाला चिंब करणारा हा अपूर्व मातृगौरव सोहळा म्हणजे आयुष्यातला काळजावर कोरला गेलेला एक अविस्मरणीय अनुभवच म्हणता येईल.