आम्ही बळीचे वंशज (कविता)

आम्ही बळीचे वंशज (कविता)

आम्ही बळीचे वंशज

आम्ही बळीचे वंशज
नाही अंधाराची भिती
काढू ठेचून कपटी
दुष्ट वामनी प्रवृत्ती

जिणे काबाडाचे जितो
आम्ही कुणबी जातीचे
जन्मभर पोसणार्‍या
ऋण मानतो मातीचे

अज्ञानाच्या पाताळात
ढकलले फसवून
शुद्र घातले गाळात
ज्ञानपोई लपवून

बंदीअस्र बहूजना
भटभिक्षुक करणी
मनुविचार विषाची
मेंदूमेंदूत पेरणी
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने