-----बहर ओसरताना!
किती वाढले अंतर
ओढ संपता संपेना
वेदनेच्या उद्यानात
कळवळते प्रार्थना
रंग फिकटला पार
शब्दवाणी थिजलेली
नेणिवेच्या ओंजळीत
उत्कटता भिजलेली
व्याकुळल्या दिवसांचा
झाला सोहळा असह्य
प्रीतिवंत भावनांना
कधी मिळेल अभय?
नव्या गोकुळाची गेली
आता बदलून रीत
घनःश्याम सावळ्याचा
आर्त विरही आकांत
धेनू हंबरते,दाटे
यमुनेस गहिवर
थबकला मयूरही
स्थिर बासरीचा सूर
कदंबाच्या सावलीला
राधेने पांघरताना
किती जपावे जीवाला?
बहर हा ओसरताना
किती वाढले अंतर
ओढ संपता संपेना
वेदनेच्या उद्यानात
कळवळते प्रार्थना
रंग फिकटला पार
शब्दवाणी थिजलेली
नेणिवेच्या ओंजळीत
उत्कटता भिजलेली
व्याकुळल्या दिवसांचा
झाला सोहळा असह्य
प्रीतिवंत भावनांना
कधी मिळेल अभय?
नव्या गोकुळाची गेली
आता बदलून रीत
घनःश्याम सावळ्याचा
आर्त विरही आकांत
धेनू हंबरते,दाटे
यमुनेस गहिवर
थबकला मयूरही
स्थिर बासरीचा सूर
कदंबाच्या सावलीला
राधेने पांघरताना
किती जपावे जीवाला?
बहर हा ओसरताना
सुंदर
उत्तर द्याहटवा