उभा पारिजात दारी
सुगंधीत दुलईस
अंगभर पांघरत
डोळे ठेवून उघडे
पहूडला पारिजात
अंधाराच्या संगतीत
दर्वळाची बरसात
उभा तो गा अंगणात
फुले पडती दारात
देठकेशरी अंदाज
किती नाजूक साजूक
कलावंत निसर्गाची
किमया की करामत?
रोप लावूनिया दारी
बाप गेला दिगंतात
दिली जन्माची श्रीमंती
नाही कशाची ददात
पायदळी पारिजात
जीव मायचा तुटतो
फुले वेचता वेचता
तिचा हुंदका दाटतो!
१७-०९-२०१८.
सुगंधीत दुलईस
अंगभर पांघरत
डोळे ठेवून उघडे
पहूडला पारिजात
अंधाराच्या संगतीत
दर्वळाची बरसात
उभा तो गा अंगणात
फुले पडती दारात
देठकेशरी अंदाज
किती नाजूक साजूक
कलावंत निसर्गाची
किमया की करामत?
रोप लावूनिया दारी
बाप गेला दिगंतात
दिली जन्माची श्रीमंती
नाही कशाची ददात
पायदळी पारिजात
जीव मायचा तुटतो
फुले वेचता वेचता
तिचा हुंदका दाटतो!
१७-०९-२०१८.
व्वाह...
उत्तर द्याहटवा