शिवनीती

शिवनीती

शिवनीती

म्हणे,गुरु शिवबाचा
आहे कुणी गोसावडा
निर्मि भ्रम ऐसे त्याच्या
ठेवू डोईवर जोडा
                   
नाही कोणी मावळात
फाळ सोनियाचा अडवला
मराठ्यांचा राजा,माता
जिजाऊंनी घडवला

राज्याभिषेकाचा विधी
नाकारिता  भटशाही
तेव्हा हा गुरु गोसावी
गुहेमध्ये गुप्त होई!

कुणब्यांचा धनी ठरे
यांच्यालेखी शूद्र-हीन
मंबाजीचे भाऊबंद
धर्म खाती खरडून

नव्हे गुरु अन्य कोण
पून्हा सांगतो निक्षून
तुकोबांचा बीजमंत्र
शिवनितीचा की प्राण!
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने