मुंबई (कविता)

मुंबई (कविता)

मुंबई

मराठी माणसे तिची लेकरे
मुंबई आमची गाय
घास तोंडचा आमच्या काढून
देशासाठी मरते माय

परप्रांतिय गोचिड चिकटले
वेदनेने ती विव्हळत जाय
बकालपणाच्या भोवती माशा
धनदांडगे खाती साय

दूध पिऊनि राष्ट्र पुष्ट पण
तिला न घाली कोणी चारा
अर्थपुरवठा करुन खंगली
पेलून देशाचा डोलारा

वासरांची ना तिजला पर्वा
येतील त्यांना देते थारा
तरिही फिरती मानेवरती
दिल्लीमधल्या कसाबी नजरा!
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने