पत्नीव्रता पती!

पत्नीव्रता पती!

 पत्नीव्रता पती!
❤️
ते इतके पत्नीव्रता पती होते की 
अधून मधून प्रेयसींना ऐकवत राहिले पत्नीच्या मोठेपणाचे किस्से
इतके पत्नीव्रता की 
प्रेयसींविना त्यांचं काहीच चालू 
शकत नव्हतं
परंतू त्यांची संपूर्ण निष्ठा पत्नीसाठी राखीव होती
प्रेयसी ही हवापालटाची जागा होती
आयुष्यात थोडीफार रंगबाजीसुद्धा हवी ना!
ते इतके पत्नीव्रता होते की त्यांनी नाही पाळले प्रेयसीला दिलेले कुठलेही वचन
त्यांचं सगळं अघळपघळ बोलणं हे घूमजाव करण्यासाठी होतं
त्यांच्या फोनमध्ये प्रेयसींचे नंबर 
सेव्ह नव्हते
ते प्रेयसीसोबत असतानाही 
उचलत असत पत्नीचा फोन
प्रेयसीला गप्प राहण्याचा इशारा करून पत्नीला म्हणत,
'एके ठिकाणी अडकलोय यार'
पत्नीव्रता पती खूपच भोळेभाबडे आणि निरागस प्राणी होते की
पत्नीच्या सांगण्यानुसार यांना परस्त्रियाच आपल्या जाळ्यात अडकवत असत!
पण पुनःपून्हा ते परतत असत पत्नीपाशीच..
पत्नीजवळ माफीचं आगर असायचं
हे माफीच्या ओझ्याने आणखी जरा पत्नीव्रताधर्मी होऊन जात
मग त्यांच्या 'हॅप्पी कप्पल'च्या ढिगभर सेल्फी प्रसारीत होत असत
लोक यांच्या फोटोंवर साडेतीनशे कमेंटा आणि सहाशे लायका देत
पत्नीव्रता पती प्रेयसींची आयुष्यं उद्धवस्त करून वाचवत असतो पत्नीची पदवी
प्रेयसींच्या बरबादीवर उभं आहे 
त्याचं घर
सर्वात पत्नीव्रता पती सिद्ध झालेत सर्वात घाबरट आणि भेत्रट प्रियकर

मराठी अनुवाद 
भरत यादव
Bharat Yadav

मूळ हिंदी कविता
पत्नीव्रता पति
❤️
वो इतने पत्नीव्रता पति थे कि गाहे बगाहे प्रेमिकाओं को सुनाते रहे पत्नी की महानता के किस्से 
इतने पत्नीव्रता कि प्रेमिकाओं के बिना उनका काम न चलता
लेकिन उनकी तमाम निष्ठा पत्नी के लिये सुरक्षित थी
प्रेमिका हवा पानी बदलने की जगह थी
ज़िंदगी में थोड़ा रंग-ओ-आब भी चाहिए
वो इतने पत्नीव्रता थे कि उन्होंने नहीं निभाया प्रेमिका से कोई वादा
उनकी तमाम लच्छेदार बातें मुकरने के लिये थी
उनके फोन में प्रेमिकाओं के नंबर सेव नहीं थे
वे प्रेमिका के साथ होते भी अटेंड करते पत्नी के फोन
प्रेमिका को चुप रहने का इशारा कर पत्नी से कहते 'कहीं फंस गया हूँ यार' 
पत्नीव्रता पति बेहद भोले और मासूम प्राणी थे
बकौल पत्नी इन्हें परस्त्री अपने जाल में फंसा लेती
लेकिन घूम घामकर वो लौटते पत्नी के ही पास 
पत्नी के पास माफ़ियों का भंडार होता 
ये माफ़ी के भार से थोड़ा और पत्नीव्रत धर्मी हो जाते 
फिर इनकी हैप्पी कपल वाली ढेरों सेल्फी रिलीज़ होती 
लोग इनकी फोटुओं पर साढ़े तीन सौ कमेंट और  छह सौ लाइक करते हैं
पत्नीव्रता पति प्रेमिकाओं का जीवन तबाह कर बचा लेता है पत्नी की पदवी
प्रेमिकाओं की बर्बादियों पर खड़ा है उसका घर 
सबसे पत्नीव्रता पति साबित हुए सबसे कायर और डरपोक प्रेमी

©श्रुती कुशवाहा
Shruty Kushvaha

4 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा
थोडे नवीन जरा जुने