आजकालचे अभंग!

आजकालचे अभंग!


 आजकालचे अभंग!


उच्चवर्णियांची

नीच मक्तेदारी

जात पिचकारी

दंभयुक्त


कलेच्या प्रांतात

का रे भेदभाव?

सौहार्दाचे गाव

नासविता


सदाशिवपेठी

मिरविती साचा

बोलती जे वाचा

नागपूरी


अजूनी छळती

तुकोबास किती

मंबाजी प्रवृत्ती

मेली नाही

 

सत्तेविरोधात

उघडता तोंड

दरबारी भांड

खवळती


लोकहितासाठी

जे जे झुंजतात

खरे कलावंत

तेचि होत


जातश्रेष्ठत्वाला

मिळो मूठमाती

पेशवाई वृत्ती

जळो आता!

©भरत यादव

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने