प्रेमपत्र
💚
प्रिये
मला लिहायचे होते प्रेमपत्र
पण
माझ्या देशाचा राजा
युद्धाच्या आघाडीवर होता
आणि
तो घेऊन गेला होता
आपल्यासोबत न जाणे किती जवान
मी लिहितोय
बसून त्यांना पत्र
माघारी बोलावण्यासाठीचे
की
त्यांच्या आया रडतायत-
आणि
त्यांच्या प्रेयसींना आपले
वायदे पूर्ण होण्याची प्रतिक्षा आहे
युद्धाच्या रोमांचात
प्रेम विसरले गेलेय
किती वर्षांपासून इथे
कुणी प्रेमकविता नाही लिहिली-
किंकाळ्यांच्या मध्ये
मी प्रेमपत्र कसे लिहावे
एक दिवस सगळ्या
वीररसपूर्ण कविता
जेव्हा रक्ताने माखतील
आणि मिटून जाईल
शौर्यगाथांची तहान-
इकडच्या आणि तिकडच्या
दोन्ही राष्ट्रांच्या साहित्यात
आणि
जिंकणार्या राजाच्या
दरबारात
जेव्हा माघारी परतून आलेल्या
जखमी सैनिकांसाठी
नकली प्रेमकविता वाचल्या जातील
तेव्हा मी तुला
प्रेमपत्र लिहिन-
ज्यात खरंखुरं लिहिलेलं असेल
इतिहास आणि साहित्याला
चाकरी करायची आहे-
माझे प्रेमपत्र
या काळातील
सत्याला शिल्लक राखेल
म्हणूनच मुडदेकाळातील
शांततेतच ते लिहायला हवे
खोट्याच्या कोलाहलात
आणि
माझ्या देशातील मुलांच्या
हास्याशिवाय
प्रिये
मी नाही लिहू शकणार
प्रेमपत्र.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
💚
प्रिय
मैंने लिखना चाहा प्रेमपत्र
पर
मेरे मुल्क का बादशाह
जंग पर था।
और
वो ले गया था साथ
अपने जाने कितने नौजवान।
मैं लिखता हूँ
बैठ कर पत्र उनको
वापिस बुलाने को-
कि
उनकी माएँ हैं रोती-
और
उनकी प्रेमिकाओं को अपने
वायदे पूरे होने का इंतेज़ार है।
युद्ध के रोमांच में
प्रेम भुला दिया गया है।
कितने सालों से यहाँ
किसी ने प्रेम कविता नहीं लिखी-
चीत्कारों के बीच में
मैं प्रेमपत्र कैसे लिख दूँ।
एक दिन सारी वीर रस की
कविताएँ
जब भर जाएंगी लहू से
और मिट जाएगी
शौर्य गाथाओं की प्यास-
इधर और उधर
दोनों मुल्कों के साहित्य में।
और
जीतने वाले बादशाह के
दरबार में
जब वापिस
घायल आये सैनिकों के लिए
फरेबी प्रेम कविताएँ पढ़ी जाएंगी-
तब मैं तुम्हें
प्रेम पत्र लिखूँगा-
जिसमें सच लिखा होगा।
इतिहास और साहित्य
को चाकरी करनी है-
मेरा प्रेमपत्र
इस काल के
सच को बचा कर रखेगा।
इसलिए मुर्दा-काल की शांति में
ही
उसे लिखना होगा।
झूठ के कोलाहल में
और
मेरे मुल्क के बच्चों
के बिना हँसे
प्रिय
मैं नहीं लिख पाऊँगा
प्रेमपत्र।।
©किताबगंज
Kitabganj
(आर्ट : Everyday Refugees )
छान
उत्तर द्याहटवा