ते जे धर्मग्रंथात बुडालेत!

ते जे धर्मग्रंथात बुडालेत!

 ते जे धर्मग्रंथात बुडालेत

काही लोक सोडतील आपला हेका
एक दिवस
की
सूर्य पूर्वेस उगवतो आणि पश्चिमेस मावळतो
वैश्विक सत्य म्हणत जे गिरवत आहेत धडे
ते बदलतील आपली धारणा
जेव्हा समजून घेतील की
उगवणे-मावळणे हे काम
सूर्याचे नाहीये.
ते जे
शिकत/ शिकवले जात आहेत
की दोन तृतीअंश पाणी आहे आणि 
एक तृतीअंश भूखंड
ते ही बदलतील आपले मत
जेव्हा समजून घेतील की
पूर्वीपासून नव्हते समुद्र
कायम नाहीत राहणार
की जिथे समुद्र आहेत त्याच्याखाली
देखील तळ आहे
ते समजून घेतील एक दिवस
की पाण्यावर तळ असत नाही
तळावर पाणी असतं ते
ते जे 
शिकताहेत धर्मग्रंथ
वाचताहेत श्लोक आणि आयत
स्तुतीगानात नरडी फाडत आहेत
कान फोडत आहेत
ते
जे आकंठ बुडालेत धर्मग्रंथांमध्ये
कधी नाही बदलणार
ते ग्रंथ हे विज्ञानाचे उगमस्त्रोत असल्याचे 
सिद्ध करतील
जाणतात जे की
विज्ञानाचा पहिला प्रयोग नग्न माणसाने केला होता
आणि धर्माचा शोध वस्त्राने झाकले 
गेलेल्या माणसाने लावला होता.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav

मूळ हिंदी कविता

वे जो धर्मग्रन्थो में गड़े हैं

कुछ लोग 
बदल लेंगे अपनी जिद किसी दिन
कि सूर्य पूर्व से उदय होता है
और पश्चिम में अस्त
यूनिवर्सल ट्रूथ बोलकर जो याद कर रहे हैं पाठ
वे बदल लेंगे अपनी धारणा
जब समझेंगे कि उदय-अस्त होने का काम 
सूर्य का नही। 
वे जो
पढ/पढ़ा रहे हैं
कि दो तिहाई जल है और एक तिहाई भूखंड 
वे भी बदल लेंगे अपना मत
जब समझेंगे कि सदा नही थे समन्दर
सदा नही रहेंगे
कि जहां समन्दर हैं उसके नीचे भी तल है,
वे समझेंगे एक दिन
कि जल पर तल नही होते
तल पर जल होता है
वे जो
पढ रहे हैं धर्मग्रन्थ
बांच रहे हैं श्लोक और आयतें
स्तूतियों में गला फाड़ रहे हैं, कानफोड़ रहे हैं
वे
जो आकंठ गड़े हैं धर्मग्रंथों में
कभी नही बदलेंगे
वे ग्रंथो को विज्ञान का उद्गम स्रोत सिद्ध करेंगे
जानते हैं जबकि
कि विज्ञान का प्रथम प्रयोग नँगे  आदमी ने किया था
और धर्मों का अविष्कार तन ढके आदमी ने
 
©वीरेंदर भाटिया
Virendar Bhatia

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने