त्यांची प्रतिकं

त्यांची प्रतिकं

त्यांची प्रतिकं

आम्हांला कधी नाही सांगितलं गेलं
गायीची पूजा करण्यास
कधी शिकवलं गेलं नाही
क्रूसाच्या पवित्रतेचा प्रचार करा म्हणून
ना कधी सांगितलं गेलं
चाॅंद-तारे हे धर्माचे प्रतीक आहेत म्हणून

ना कधी आम्ही बायबल वाचले
आणि ना कधी
कुराणातील आयतांचे पाठांतर केले
ना ही खांद्यावरून
*बहिंगा ला उतरवून
गीतेचे ओझे उचलले

लोक आम्हांला म्हणत राहिले जंगली
आम्ही असभ्य असण्याची पदवी मिळवली
पूर्वजांना म्हटले गेले असुर

आम्ही काहीही म्हणालो नाही
बदल्यात आपल्या भाषेच्या
विशेषणांना बिघडवले नाही
आम्ही एक तर
**मांदलाची दोरी ताणत राहिलो
असेच आम्ही गाणी विणत राहिलो

आम्हांला समजत नाहीत
त्यांची अनमोल वचनं
जी ईश्वराच्या महिमेने भरलेली असतात
जी ईश्वर एकमेव सत्ता असल्याचं सांगतात
तीच वचनं ईश्वराला वाचविण्यासाठी
आम्हांला बलिदानाचे आवाहन करतात?

सेवा ज्यांच्यासाठी
आपला झेंडा फडकविण्याचा 
चोर दरवाजा आहे
तेच जंगलात
प्रतिकांना घेऊन येतात.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 


*बहिंगा-वेतांपासून बनविल्या जाणार्‍या दोन दुरड्यांना पेलण्याचे एक लाकडी साधन.

**मांदल-एक आदिवासी चर्मवाद्य

( आदिवासी मुंडारी भाषेतील हे वैशिष्ठ्यपूर्ण शब्द आहेत,नागरीभाषांमध्ये त्यांना आणि अशा अनेक शब्दांना अजूनही पर्यायी शब्द उपलब्ध नाहीत.)

मूळ हिंदी कविता

उनके प्रतीक 

हमें कभी कहा नहीं गया 
गाय की पूजा करने के लिए
कभी सिखाया नहीं गया
क्रूस की पवित्रता का प्रचार करने के लिए
न ही कभी बताया गया
चांद-तारों को धर्म का प्रतीक

न ही हमने कभी बाइबिल पढ़ा
और न ही कभी
कुरान की आयतें दुहराईं
न ही कन्धे से
बहिंगा को उतार कर 
गीता का बोझ उठाया

लोग हमें कहते रहें जंगली
हमने असभ्य होने की उपाधि पायी 
पुरखों को कहा गया असुर

हमने कुछ भी नहीं कहा 
बदले में अपनी भाषा के
विशेषणों को नहीं बिगाड़ा
हम या तो 
मांदल की डोरी तानते रहे
ऐसे ही हम गीत बुनते रहे

हम समझ नहीं पाते हैं
उनके अनमोल वचन
जो ईश्वर की महिमा से भरे होते हैं 
जो ईश्वर को एकमात्र सत्ता बताते हैं 
वही वचन ईश्वर को बचाने के लिए हमसे
क़ुर्बानी का आह्वान करते है?

सेवा जिनके लिए 
अपना झण्डा फहराने का चोर दरवाज़ा है 
वे ही जंगलों में
प्रतीकों को लेकर आते हैं।

©अनुज लुगुन
Anuj Lugun 

कविता साभारः
अनुज लुगुन जी का नया कवितासंग्रह पत्थलगड़ी से
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने