खोटारडे देशभक्त

खोटारडे देशभक्त

खोटारडे देशभक्त

सत्यानाश करणार्‍या काटेरी गवताच्या बियांची
मोहरीच्या दाण्यात भेसळ करणारे
करताहेत देशभक्तीच्या खोटारड्या बाता

निरपराध नागरिकांच्या हत्या करणारे
देताहेत पाप-पुण्याचा धर्मोपदेश

काळाबाजार करत चढ्या भावाने
सामान्य ग्राहकांना वस्तु विकणारे 
व्यापारी शिकवत आहेत इमानदारीचे धडे

गुन्हेगारांकडून लाच घेऊन चूकीचा न्याय करणारे 
व्यक्त करताहेत अन्यायावर चिंता

खरे बोलणार्‍यांना तुरूंगात टाकणारा
हुकूमशहा लोकशाहीचा जप करतो आहे

हे सर्वकाही पाहूनदेखील गप्प राहाणारे 
लेखक-कवी
स्वतःला बांधिलकी मानणारे म्हणवतायत
मला आठवताहेत महाकवी गालिब
जे लिहून गेलेत,
'जब आंख ही से न टपका तो फिर लहू क्या है'

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

सत्यानाशी कंटैली के बीजों को
सरसों के दानों में आधमआध मिलाने वाले 
करतै हैं देशभक्ति की झूठी बातें

निरपराध नागरिकों की हत्यायें करने वाले
देते हैं पाप-पुण्य के धर्मोपदेश

कालाबाज़ारी कर दुगने भाव 
आम उपभोक्ता वस्तुयें बेचने वाले व्यापारी 
पढ़ाते हैं ईमानदारी का पाठ 

अपराधी से रिश्वत लेकर ग़लत न्याय करने वाले
जताते हैं अन्याय पर चिन्ता 

सच बोलने वालों को क़़ैद करने वाला तानाशाह 
नाम जप रहा है जनतंत्र का 

ये सब देख कर भी चुप रहने वाले लेखक-कवि
स्वयं को प्रतिबध्द बताते हैं 
मुझे याद आ रहे हैं ग़ालिब 
"जब आँख ही से न टपका तो फिर लहू क्या है"

©Kailash Manhar
     कैलाश मनहर 
    
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने