त्याला माझा चेहरा पसंत नाही!

त्याला माझा चेहरा पसंत नाही!

असगर वजाहत 
यांची एक कथा

त्याला माझा चेहरा पसंत नाही

त्याने आधी माझे नाव बदलले,मग त्याने माझा पोषाख बदलून टाकला.
मग त्याने माझा मोहल्ला बदलला.
माझे खाणे पिणे बदलून टाकले.
आता तो मला अनेकवेळा म्हणाला आहे-
मी तुझ्या चेहर्‍याला बदलून टाकेन.
तुझा चेहरा मला चांगला नाही वाटत.
माझ्या चेहर्‍यावर त्याला काही गोष्टी खूप वाईट वाटतात.
तो म्हणतो की तुझा चेहरा तसा नाहीये जसा मला हवा आहे.
तो म्हणतो-
माझा चेहरा घाणेरडा वाटतो.
माझा चेहरा खोटारडा आणि नीच वाटतो.
माझा चेहरा चलाख बदमाश वाटतो.
माझा चेहरा इन्कमटॅक्सचोराचा चेहरा वाटतो आहे.
माझा चेहरा साठेबाज आणि नफेखोराचा चेहरा वाटतो आहे.
माझा चेहरा देशाच्या एकतेला आणि अखंडतेला तोडणारा वाटतो आहे
माझा चेहरा दहशतवादी वाटतो आहे
माझा चेहरा देशद्रोही वाटतो आहे

एके दिवशी मी त्याच्या तावडीत सापडलो
त्याने मला आॅपरेशन थिऐटरमध्ये नेले आणि त्याने
माझा चेहरा बदलण्यास सुरूवात केली.
खूप घाईमुळे तो मला भूल द्यायलाही विसरला.
त्यामुळे जेव्हा त्याने चेहर्‍याची कापाकापी फोडाफोडी सुरू केली तेव्हा मला खूप वेदना झाल्या पण मी असहाय्य होतो.
तो माझ्या चेहर्‍याला कापत-छाटत राहिला.
बराच वेळ लागला.
नंतर तो म्हणाला की पाहा तुझा चेहरा आता एकदम नीट झाला आहे.
त्याने मला आरसा दाखवला.
मला माझा चेहरा त्याच्या चेहर्‍यासारखा वाटला.
मी त्याला म्हणालो-
तू सुद्धा आरसा बघ
त्याने आरसा पाहिला.
त्याचा चेहरा हुबेहूब माझ्या चेहर्‍यासारखा झाला होता जसा तो माझा चेहरा पाहात होता.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav

मूळ हिंदी कथा

उसे मेरा चेहरा पसंद नहीं 

उसने पहले मेरा नाम बदला, फिर उसने मेरा पहनावा बदल दिया। फिर उसने मेरा मोहल्ला बदल दिया। मेरा खाना पीना बदल दिया।
अब वह मुझसे कई बार कह चुका है- मैं तुम्हारे चेहरे को बदल डालूंगा। तुम्हारा चेहरा मुझे अच्छा नहीं लगता ।'
मेरे चेहरे पर उसको कई बातें बहुत बुरी लगती है। वह कहता है कि तुम्हारा चेहरा वैसा नहीं है जैसा मैं चाहता हूं । वह कहता है- 
मेरा चेहरा गंदा लगता है।  
मेरा चेहरा झूठा और मक्कार लगता है।
मेरा चेहरा शातिर बदमाश लगता है। 
मेरा चेहरा इनकम टैक्स चोर का चेहरा लगता है।
मेरा  चेहरा जमाखोर और मुनाफ़ाखोर का चेहरा लगता है।
मेरा चेहरा देश की एकता और अखंडता  को तोड़ने वाला लगता है।
मेरा चेहरा आतंकवादी लगता है। 
मेरा चेहरा देशद्रोही लगता है।

एक दिन मैं  उसकी पकड़ में आ गया। 
वह मुझे ऑपरेशन थिएटर में ले गया और मेरा चेहरा बदलना शुरू कर दिया। बहुत जल्दी में वह मुझे एनेस्थीसिया देना भी भूल गया । इसलिए जब उसने मेरे चेहरे की काट पीट शुरू की तो मुझे बहुत दर्द हुआ लेकिन मैं मजबूर था।
वह मेरे चेहरे को काटता- छांटता रहा। काफी समय लगा। 
फिर उसने कहा कि देखो तुम्हारा चेहरा अब बिल्कुल ठीक हो गया। 
उसने मुझे आईना दिखाया। मुझे अपना चेहरा उसके चेहरे जैसा लगा।
मैंने उससे कहा- तुम भी तो आईना देखो।
उसने आईना देखा। उसका चेहरा बिल्कुल मेरे वैसे चेहरे जैसा हो गया था जैसा वह मेरा चेहरा देखता था।

©असगर वजाहत
Asghar Wajahat
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने