खुजा विचार करतात जे लोक
काही लोकांना ते खुजे समजतात
जाती-धर्माच्या आधारावर
विभागून टाकतात माणुसकी
लिंगाधारीत श्रेष्ठता त्यांच्या आचरणात असते
ते घरातल्या स्त्रियांना घरात कोंडून ठेवतात
बाहेर पडलेल्या स्त्रियांना उर्च्छुंखल
समजतात
धरण्यास टपलेले असतात त्यांना
जणू काही उपलब्ध असतात त्या
प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळी
खुजा विचार करतात जे लोक
ते दलितांच्या शोषणात गुंतलेले असतात
गरीबाला गरीबच ठेवू पाहतात
ते पुरुषसत्ताकतेचे प्रतिनिधी असतात
आपल्याच सत्तेच्या अवतीभवती फिरत असतो त्यांचा सगळा विचार आणि त्यांची दिनचर्या
खुज्या विचाराचा माणूस
माणुसकीवर प्रेम करत नसतो
तो वर्गीय घटक असतो
भ्रम कायम राखतो एका वर्गाचा प्रतिनिधी असल्याचे
खरेतर तो त्या वर्गाचे काही
हित करत नाही
त्याच्या आपल्या सत्तेचे
गुणाकार-भागाकार असतात
तमाम वर्ग
खुज्या विचाराचा व्यक्ती
माणसांना वेगवेगळ्या वर्गात विभागून पाहात असतो
तो मानवतेला रक्तबंबाळ केल्यानंतरही कधी रडत नसतो
वैयक्तीक नुकसानीबद्दल तो
हमसून हमसून रडत असतो
इथे-तिथे रडत राहातो
शोकांतिका ही आहे
की खुज्या विचारांची माणसं
आजकाल मोठी मानली जाताहेत.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
छोटी सोच के लोग
छोटा सोचते हैं जो लोग
वे कुछ लोगों को छोटा समझते हैं
जाति धर्म के आधार पर
बांट कर रखते हैं मनुष्यता
लिंग आधारित श्रेष्ठता उनके व्यवहार मे होती है
वे घर की स्त्रियों को घर मे कैद रखते हैं
बाहर निकली स्त्रियों को उच्छरिंकल समझते हैं
लपकने को आतुर रहते हैं उन्हें
जैसे कि उपलब्ध हैं वे हरसमय हरकाल
छोटा सोचते हैं जो लोग
वे दलित के शोषण में लिप्त होते हैं
गरीब को गरीब बनाये रखना चाहते हैं
वे पितृसत्ता के प्रतिनिधि होते हैं
अपनी ही सत्ता के इर्द गिर्द घूमती है उनकी तमाम सोच
और दिनचर्या
छोटी सोच का आदमी
मनुष्यता से प्रेम नही करता
वह वर्गीय पुर्जा होता है
भ्रम बनाए रखता है एक वर्ग के प्रतिनिधि होने का
असल मे वह उस वर्ग का कोई भला नही करता
उसकी अपनी सत्ता का गुणाभाग होते हैं तमाम वर्ग
छोटी सोच का आदमी
मनुष्य को अलग अलग वर्गों में बांट कर देखता है
वह मनुष्यता को लहूलुहान कर देने पर कभी नही रोता
व्यक्तिगत हानी पर वह फूट फूट रोता है
जहां तहां रोता है
अफसोस यही है
कि छोटी सोच के आदमी
इन दिनों बड़े समझे जाने लगे हैं
©वीरेंदर भाटिया
virendar bhatia
चित्रकार
Sylvain Coulombe