कर्म करण्याची भावना

कर्म करण्याची भावना

कर्म करण्याची भावना

मी धनुष्य नाही तोडले
मला वनवास नाही घडला
मी आपल्या पत्नीची अग्निपरीक्षादेखील
घेतली नाही
मी लढलो नाही आपल्या अपत्यांविरूद्ध
मर्यादा मानली नाही कसली
मी अमर्यादित काम केले.

माझ्यापाशी ना बाग-बगीचे होते
ना गोपी,ना गोपाळ
गायी भरपूर होत्या शहरभरात
चालत्या वाहनांना धडकणार्‍या
माझ्या सायकलीचे गज तोडणार्‍या
मरणार्‍या,कापल्या जाणार्‍या
डब्ब्यांमध्ये बंद होणार्‍या
कसायाच्या दुकानावर लटकणार्‍या
कसायाला झुंडीकडून बदडवणार्‍या
माणसानंतर
राजकारणाचा मूक मोहरा बनण्याचे
श्रेय मिळवणार्‍या
परंतू मी त्याकडे लक्ष नाही दिले
फक्त आपले कर्म केले.

मी फासे नाही टाकले
मी द्रौपदी नाही जिंकली
मी हस्तिनापूर नाही हरलो
मी अज्ञातवासात नाही राहिलो
दोन खोल्यांच्या घरात राहताना
मी मनःपूर्वक आपले कर्म केले
मी सुंता नाही केली
गुडघ्याच्या वर पायजमा नाही घातला
रडवेले तोंड करून दुआ नाही मागितली
खिडकीबाहेर पाहिले उशीरापर्यंत
दूरवर विचार केला
गुपचूप आपले कर्म केले

मी झाडाखाली मोक्ष नाही मिळवले
कुणाला अमृत नाही पाजले
मी सुळावर नाही चढलो

खूपशा संधी होत्या माझ्यापाशी
देव किंवा त्याचा भ्रम बनण्याच्या
मी माणूस होऊनच जगलो
पत्नीला दुःख नाही दिले
मुलांवर आपली स्वप्नं नाही लादली
अंगणातील वाफ्यात
नवी रोपटी रूजवली
मी आपले कर्म केले.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav

मूळ हिंदी कविता

काम की भावना

मैंने धनुष नहीं तोड़ा 
मुझे वनवास नहीं हुआ
मैंने अपनी पत्नी की
अग्निपरीक्षा भी नहीं ली
मैं लड़ा नहीं अपनी संतान के विरुद्ध
मर्यादा नहीं निभाई कोई
मैंने अमर्यादित काम किया

मेरे आस पास न कुंज विहार थे
न गोपियां, न ग्वाल बाल
गाय बहुत थी शहर भर में
चलते वाहनों से टकराती हुईं
मेरी साईकल के गज तोड़ती हुईं
मरती हुईं, कटती हुईं
डिब्बों में बन्द होती हुईं
कसाई की दुकान पर लटकती हुईं
कसाई को भीड़ से पिटवाती हुईं
आदमी के बाद
राजनीति का मूक मोहरा बनने का
श्रेय प्राप्त करती हुईं
परन्तु मैंने उन पर ध्यान नहीं दिया
बस अपना काम किया

मैंने पांसा नहीं फेंका
मैंने द्रौपदी नहीं जीती
मैं हस्तीनापुर नहीं हारा
मैं अज्ञातवास में नहीं रहा
दो कमरों के घर में रहते हुये
मैंने मन से अपना काम किया
मैंने सुन्नत नहीं रखी
टकनों के ऊपर पैजामा नहीं पहना
रोनी सूरत बना कर दुआ नहीं मांगी
खिड़की के बाहर देखा देर तक
दूर तक सोचा
चुपचाप अपना काम किया

मैंने वृक्ष के नीचे मोक्ष नहीं पाया
किसी को अमृत नहीं छकाया
मैं सूली पर नहीं चढ़ा

बहुत मौके थे मेरे पास
भगवान या उसका भरम होने के
मैं इन्सान बनके ही जिया
पत्नी को दुख नहीं दिया
बच्चे पर अपने सपने नहीं थोपे
आँगन की क्यारी में
नये पौधे रोपे
मैंने अपना काम किया।

©इरशाद कामिल
Irshad Kamil
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने