पूर्वज युद्ध करत राहिले
जखमा घेऊन घरी परतले
वीर म्हणवले गेले
पूर्वजमाता तुरूंगात राहिल्या
बेड्या वागवत वागवत पूर्वजांच्या जखमांवर मलम लावत राहिल्या
मलम लावता लावता मरून गेल्या
जखमा आणि तुरूंगवास यापैकी एक पर्याय निवडायचं झाल्यास तू काय निवडशील?
तू म्हणशीलःजखमांच्या वेदनांपेक्षा तर तुरूंगवासातील अस्वस्थता बरी
पण पूर्वजमाता म्हणतीलःजखमांना काळ भरून काढत असतो पण काळ तुरूंगवास कमी करू शकत नाही
काळ; तुरूंगवासाची सवय लावून सोडतो,मग स्वातंत्र्याची भीती वाटायला लागते
मग झोपेत सुद्धा स्वातंत्र्य भयंकर स्वप्नाच्या रूपात यायला लागते
काळ;पूर्वजांचा तुरूंगवास कमी करू नाही शकला पण काळामुळे पूर्वजांच्या जखमा अवश्य भरून निघाल्या
जखमा आणि तुरूंगवास यापैकी एक निवडायचे झाल्यास तू तुरूंगवास निवडू नकोस माझे पोरी...
मानलं की जखमांनी मरू शकतो आपण
पण पूर्वजांप्रमाणे वीर तर म्हणवले जाऊ ना?
जखमांनी तडफडून मरून जाणे,
तुरूंगवासात राहून घुसमटत मरण्यापेक्षा शंभरपटीने उत्तम पर्याय आहे
तुला ज्या प्रकारे मरायचे असेल तसे मर माझे बये....
परंतू कमीतकमी माझ्यासारखी पश्चातापाच्या आगीत जळू नकोस !
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
पुरखिनें
पुरखे युद्ध करते रहे
घाव लेकर घर लौटे
वीर कहलाए।
पुरखिनें कारावास में रहीं
बेड़ियां पहने-पहने पुरखों के घावों पर मरहम लगाती रहीं
मरहम लगाते-लगाते मर गईं।
घाव और कारावास में से कोई एक विकल्प चुनना हो तो तुम क्या चुनोगी?
तुम कहोगी : घाव की पीड़ा से तो कारावास की बैचेनी भली!
पर पुरखिनें कहेंगी: घाव को समय भर देता है पर समय कारावास को कम नहीं कर पाता।
समय; कारावास का आदी बना देता है, फिर स्वतंत्रता से भय लगने लगता है
फिर नींद में भी स्वतंत्रता भयानक स्वप्न के रूप में आती है।
समय; पुरखिनों के कारावास को कम नहीं कर सका
पर समय ने पुरखों के घाव ज़रूर भर दिए।
घाव और कारावास में से एक चुनना हो
तो तुम कारावास मत चुन लेना मेरी बच्ची...
माना कि घाव से मर सकते हैं पर मरकर पुरखों की तरह वीर तो कहलाते हैं न ?
घाव से तड़प-तड़प कर मर जाना, कारावास में रहकर घुट-घुटकर मरने से सौ गुना बेहतर विकल्प है।
तुम्हें जिस तरह मरना है मर जाना मेरी बच्ची
पर कम से कम मेरी तरह पश्चात्ताप की अग्नि में जलना मत!
©नेहा नरूका
Neha Naruka