प्रधानमंत्री

प्रधानमंत्री

प्रधानमंत्री

प्रधानमंत्री देशाचे प्रधानमंत्री आहेत
तर हे साहजिक आहे की
देशाबद्दल जे काही ते बोलतील
तेच योग्य मानले जायला हवे 

प्रधानमंत्री महोदय देशाचे प्रधानमंत्री
आहेत,मग देशाच्या संविधानावर त्यांचा 
पूर्ण अधिकार आहे
ते जशी हवी तशी त्याची व्याख्या करोत
जसे हवे तसे बदल
किंवा 
पाहिजे तर गुंडाळून ठेवोत एखाद्या कपाटात

प्रधानमंत्री देशाचे प्रधानमंत्री आहेत
तेव्हा देशाच्या इतिहासाला 
उलटू-पालटूदेखील शकतात,
त्यांना अधिकार आहे
देशात नवे पुतळे आणि 
नवे नायक प्रस्थापित करण्याचाही

प्रधानमंत्री देशाचे प्रधानमंत्री आहेत
म्हणून तेच सांगतील की,
तुम्ही काय कसे कधी कोणते परिधान करावे
काय खावे काय पांघरावे काय अंथरावे

प्रधानमंत्री महाशय देशाचे प्रधानमंत्री आहेत
ते तुमच्या भूकेविषयी तुमच्यापेक्षा जास्त जाणतात
शेतकरी मजूर यांच्यापेक्षा अधिक
शेती-भाती मजूरी याविषयी जाणतात

प्रधानमंत्री देशाचे प्रधानमंत्री आहेत
त्यामुळे ते काळजी घेतात
त्यांचे पोशाख असे काही सुंदर असावेत की
ज्यामुळे देशातल्या गरीबीचा 
थांगपत्तासुद्धा लागू नये

प्रधानमंत्री देशाचे प्रधानमंत्री आहेत
मग त्यांचा हा विचार उचितच आहे
की देशातले लोक त्याच धर्माचे असावेत 
ज्याचे अनुयायी ते स्वतः आहेत
ते सांगतात की यवन आणि 
मुघलांनीसुद्धा 
हेच तर केले होते

प्रधानमंत्री देशाचे प्रधानमंत्री आहेत
मग त्यांच्याबद्दल कुठला राग तक्रार
कशाला पाहिजे
प्रधानमंत्री स्वतः तर देशाचे प्रधानमंत्री 
नाही झाले ना, 
शेवटी त्यांना निवडलेय तर 
तुम्ही-आम्ही लोकांनीच ना?

तुघलकाच्या काळात
कातड्याची नाणी चालल्याचे उदाहरण
आणि तमाम राजांचा लहरीपणा
आपल्या इतिहासात याआधीच
नोंदला गेलेला आहे !

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

प्रधानमंत्री

प्रधानमंत्री देश के प्रधानमंत्री हैं
तो यह लाज़िम है
कि देश के बारे में जो कुछ वे कहें
वही सही समझा जाये

प्रधानमंत्री जी देश के प्रधानमंत्री हैं
तो देश के संविधान पर उनका पूरा हक है
वे जैसी चाहे उसकी व्याख्या करें
जो चाहे तब्दीलियां
या चाहें तो लपेटकर कर  रख दें किसी अलमारी में

प्रधानमंत्री देश के प्रधानमंत्री हैं
तो देश के इतिहास को उलट-पलट भी सकते हैं
उन्हें अधिकार है 
देश में नई मूर्तियां और नये नायक स्थापित करने का भी

प्रधानमंत्री देश के प्रधानमंत्री हैं
तो वे ही बताएंगे कि
आप क्या कैसे कब क्या पहनेंगे
क्या खायेंगे क्या ओढ़ेंगे क्या बिछायेंगे

प्रधानमंत्री जी देश के प्रधानमंत्री हैं 
वे आपकी भूख के बारे में आपसे अधिक जानते हैं
किसान मजदूरों से ज्यादा 
खेती किसानी मजदूरी जानते हैं

प्रधानमंत्री देश के प्रधानमंत्री हैं
तो वह ख़्याल रखते हैं
उनके परिधान ऐसे सुंदर हों
जो देश की गरीबी की भनक तक ना लगने दें

प्रधानमंत्री देश के प्रधानमंत्री हैं
तो उनकी यह सोच वाज़िब है
कि देश के लोग उसी धर्म के हों 
जिसके अनुयायी वे स्वयं हैं
वे बताते हैं कि यवनों और मुगलों ने भी 
यही तो किया था

प्रधानमंत्री देश के प्रधानमंत्री हैं
तो उनसे कोई गिला-शिकवा क्यों होना चाहिए
प्रधानमंत्री खुद तो देश के प्रधानमंत्री नहीं बन गए
आख़िर उन्हें चुना तो है हम-आपने ही 

तुगलकी दौर में 
चमड़े के सिक्के चलने की नज़ीर 
और तमाम राजाओं की सनकें
हमारे इतिहास में पहले ही दर्ज़ है ! 

©राजहंस सेठ
Rajhans Seth
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने