पंचपंक्ती
सर्वशक्तीमान
निसर्गाची सत्ता
भ्रम कल्पनेची
उद्ध्वस्त व्यवस्था
फुटे बिंग
कितीक शतके
शोषणाचा काळ
घूसे आरपार
विषाणूचा फाळ
खोलवर
रक्त आणि घाम
शोषला शोषला
गरीब माणूस
पूरता नाडला
धर्मयोगे
पिळवणूकीचे
तंत्र सनातनी
कोरोना कारणे
यावे पून्हा ध्यानी
सकलांच्या
नको भेदाभेद
द्वेष तिरस्कार
माणूस तो एक
मानू पृथ्वीवर
आतातरी
-भरत यादव
Bharat Yadav