घृणा हा एक उद्योग आहे !

घृणा हा एक उद्योग आहे !

घृणा हा एक उद्योग आहे!

विकासाचे चाक
जितक्या गतीने फिरले आहे
तितक्याच वेगाने फोफावला आहे
घृणेचा उद्योग

जे स्वप्नं विकतात
तेच बहुतेकदा करत असतात
याचाही व्यापार
ते एका स्वप्नासोबत हातात देत असतात
थोडासा तिरस्कार 
भेटवस्तु दिल्याप्रमाणे
जसे मोहरीच्या तेलासोबत
दिली जाते एक वाटी
जसा दिला जात असतो साबणाबरोबर एक कंगवा

तिरस्कार पोहोचविण्याचे आणखी काही मार्ग आहेत

तुम्ही एक सिनेमा पाहून परतता
आणि थोडासा तिरस्कार सोबत 
घेऊन येता
तुम्ही क्रिकेट सामना बघून येत असता
आणि थोडीशी घृणा सोबत आणता

वर्तमानपत्र वाचताना,
दूरचित्रवाणी पाहताना
थोडा थोडा तिरस्कार जमा होत राहात असतो 
तुमच्या आत.

हा एक अजब व्यापार आहे
तिरस्कार विकणारा कधी नाही सांगत,
की
तो काहीतरी विकतो आहे.
खरेतर तो वाटत असतो घृणा
ज्याची तो मोठी किंमत वसूल करत असतो दीर्घकाळापर्यंत,
परंतू तो ही बाब मान्य करत नाही.

घृणेचे विक्रेते कोणकोणत्या वेषात भेटतील हे 
सांगणे कठिण आहे.
कधी कुणी दिसत असतो इतिहासकाराप्रमाणे
आणि म्हणत असतो की,
तो इतिहासातील चूकांना सुधारत आहे.

कधी कुणी दिसतो संतासारखा
आणि म्हणतो-
तो लोकांना संस्कृती शिकवत आहे.

आणि एक दिवस अचानक
तुम्हीही तिरस्कार-घृणा 
उद्योगाचा एक भाग बनून जाता
जेव्हा आपल्या एका जुन्या मित्राशी
बोलणे बंद करत असता
आणि म्हणत असता
असल्याच फितूरांमुळे तर
पूर्ण होत नाहीयेत आमची स्वप्नं!

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

नफरत एक उद्योग है

विकास का पहिया
जितनी तेजी से घूमा है
उतनी ही तेजी से बढ़ा है
नफरत का उद्योग

जो सपने बेचते हैं
वही अक्सर करते हैं 
इसका भी कारोबार
वे एक सपने के साथ थमा देते हैं
थोड़ी नफरत उपहार की तरह
जैसे सरसों के तेल के साथ
दी जाती है कटोरी
जैसे दी जाती है साबुन के साथ एक कंघी

नफरत पहुंचाने के और भी तरीके हैं

तुम एक फिल्म देखकर लौटते हो
और थोड़ी नफरत साथ ले आते हो
तुम क्रिकेट मैच देखकर लौटते हो
और थोड़ी नफरत साथ ले आते हो

अखबार पढ़ते हुए, टीवी देखते हुए
थोड़ी नफरत जम रही होती है तुम्हारे भीतर

यह एक अजीब व्यापार है
नफरत बेचने वाला कभी नहीं कहता
वह कुछ बेच रहा है
असल में वह बांट रहा होता है नफरत
जिसकी वह मोटी कीमत वसूलता है लंबे समय में
लेकिन वह इस बात को स्वीकार नहीं करता

इसके विक्रेता किस भेस में मिल जाएं
कहना मुश्किल है
कभी कोई दिखता है इतिहासकार की तरह
और कहता है-वह इतिहास की गलतियों 
को दुरुस्त कर रहा है

कभी कोई दिखता है संत की तरह
और कहता है-वह लोगों को संस्कृति सिखा रहा है

और एक दिन अचानक
तुम भी नफरत उद्योग का हिस्सा बन जाते हो
जब अपने एक पुराने दोस्त से
बात करना बंद कर देते हो
और कहते हो- इन्हीं गद्दारों के कारण 
पूरे नहीं हो रहे हमारे सपने।

©संजय कुंदन
Sanjay Kundan 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने