सत्यशोधकी अभंग!
🚩
माताभगिनींचा
केला मानभंग
सनातनी रंग
दाखविला
शाखेतले धडे
आम्हां शिकविती
आणि पाजळती
अक्कल गा
'मनुस्मृती'तली
मूळ ही दुर्गंधी
गटार औलादी
बरळती
उचलती जीभ
लावती टाळ्याला
नारी प्रतिष्ठेला
हिणवती
पितृसत्ताकतेचा
समर्थक चिंधू
गुलामाचा मेंदू
गुलामच
रांधा-वाढा आणि
म्हणे, उष्टी काढा
थोबाड ते फोडा
बहिणींनो!
एकधर्मियतेचा
पिटती डांगोरा
कर्तृत्व पिसारा
झडलेला
करणी निच्चाड
कमळदळाची
रेशीमबागेची
पैदास गा
सत्तेसाठी जीव
तडफडे सदैव
मातेचे मातृत्व
तुच्छ केले
सावित्रीच्या लेकी
मनु-घाण फेकू
संविधान ऐकू-
सांगू लोका
🚩
-भरत यादव
Bharat Yadav