कवी मग्न होऊन
स्त्रीच्या अथक परिश्रमावर
लिहितो आहे कविता.
स्त्री झाडून घेत असताना
कवीला पाय उचलण्यास सांगते,
कवी नाराज,
'तुला याचवेळी झाडायचं होतं?'
कवी स्त्रीप्रेमावर कविता लिहितोय
पण अधून मधून
टेबलावर ठेवलेला पत्नीचा मोबाईलसुद्धा चेक करतो आहे.
कवी मंत्रमुग्ध होऊन
स्त्रीच्या सौंदर्यावर कविता लिहितोय
पण रूममध्ये पत्नीच्या येण्याजाण्यानेसुद्धा चिडतो आहे.
कवी मोठ्या अभिनिवेशात
स्त्रीमुक्तीवर कविता लिहितो आहे
परंतू या मुक्तीअभियानात आपल्या पत्नीला सहभागी करून घेत नाहीये.
असो,
अखेर त्याने पत्नीला कविता ऐकवली
ती त्याच्या कवितांची पहिली श्रोता जी होती.
पत्नीने कविता लक्षपूर्वक ऐकली
मग हळू आवाजात म्हणाली,
'कविता तर बरी आहे,
पण या कवितेत मी कुठं आहे?'
कवी संतापून म्हणाला,
'हे समजण्यासाठी कवीमन असायला हवे,
जे तुझ्याकडे नाहीये,
कारण तू एक स्त्री आहेस...'
असे बोलून कवी कुर्ता-पायजमा
परिधान करून कवी संमेलनाच्या
दिशेने निघून गेला...
मराठी अनुवाद
भरत यादव
bharat yadav
मूळ हिंदी कविता
कवि ध्यानमग्न,
स्त्री के अथक श्रम पर लिख रहा है कविता.
स्त्री झाड़ू लगाते हुए
कवि को पैर उठाने को कहती है,
कवि नाराज़,
' तुम्हे इसी समय झाड़ू लगाना था?'.
कवि स्त्री प्रेम पर कविता लिख रहा है
लेकिन बीच-बीच में
मेज पर रखा पत्नी का मोबाइल भी चेक कर रहा है.
कवि मंत्र मुग्ध
स्त्री के सौंदर्य पर कविता लिख रहा है
लेकिन कमरे में पत्नी के आने जाने से खीझ भी रहा है.
कवि तेवर के साथ
स्त्री मुक्ति पर कविता लिख रहा है
लेकिन इस मुक्ति में अपनी पत्नी को शामिल नहीं कर रहा है.
खैर,
अन्ततः उसने पत्नी को कविता सुनाई
वह उसकी कविताओं की प्रथम श्रोता जो ठहरी.
पत्नी ने कविता ध्यान से सुनी
फिर धीमी आवाज में बोली
'कविता तो ठीक है, लेकिन इस कविता में मैं कहां हूँ?'
कवि ने झल्लाते हुए कहा
यह समझने के लिए कवि दिमाग चाहिए
जो तुममें नहीं है
क्योंकि तुम एक स्त्री हो
यह कहकर कवि कलफ़ लगे कुर्ते-पजामे में
कवि सम्मेलन की ओर निकल गया..
©मनीष आज़ाद
Manish Azad