तुम्ही ज्या मंदिरासाठी लढत आहात
तुम्ही ज्या मशिदीसाठी लढत आहात
ही माझी लढाई नाही
या लढाईत मला रस नाही.
माझा रस यात आहे की
तुमचे मंदिर,
तुमची मशिद बनण्यापूर्वी
बरोबर याच जागी कुण्या
नागरिकाचे घर होते?
बरोबर याच ठिकाणी कुण्या
नागरिकाचे शेत होते?
माझा रस
त्या घराचा,
शेताचा मालक माहित करून
घेण्यात आहे,
जाणून घ्यायचं आहे की त्याची ही
जमिन खरेदी करण्यात आली होती,
की बळजबरीने बळकावण्यात आली,
ज्याप्रमाणे वसविण्यासाठी शहर
उभारण्यासाठी मंदिर-मशिद
हिसकावले जात आहे आजही
मूळनिवासींकडून जंगल!
माझी लढाई ते जाणून
घेतल्यानंतरची आहे
जी लढायची आहे मला
पिढ्यानपिढ्या
तुमच्या मंदिर-मशिदी विरोधात
धर्म-सत्ता,
राज-सत्ता यांच्याविरूद्ध!!
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
यह मेरी लड़ाई नहीं...
तुम जिस मंदिर के लिए लड़ रहे हो
तुम जिस मस्जिद के लिए लड़ रहे हो
यह मेरी लड़ाई नहीं
इस लड़ाई में मेरी कोई रुचि नहीं,
मेरी रुचि इसमें है कि
तुम्हारे मंदिर, तुम्हारी मस्जिद बनने से पहले
ठीक इसी जगह किस नागरिक का घर था
ठीक इसी जगह किस नागरिक का खेत था
मेरी रुचि
उस घर, खेत के मालिक को जानने में है,
जानना है कि उसकी यह जमीन
खरीदी गई, या जोर-जबरदस्ती छीनी गई,
जिस तरह बसाने शहर
बनाने मंदिर-मस्जिद
छीने जा रहे हैं आज भी
मूल निवासियों से जंगल!
मेरी लड़ाई उस जानने के बाद की है
जो लड़नी है मुझे
पुस्त-दर-पुस्त
पीढी-दर पीढी!
तुम्हारे मंदिर-मस्जिद के बरक्स
धर्म-सत्ता, राज-सत्ता के विपक्ष!
©दुलाराम सहारन
Dularam Saharan