जल,जंगल,जमीन आणि आमचा आत्मा

जल,जंगल,जमीन आणि आमचा आत्मा

जल,जंगल,जमीन आणि 
आमचा आत्मा

मांसाव्यतिरिक्त,
तुम्हाला प्राण्यांपासून मिळते तरी काय?
मिळते प्रेम,
जर त्यांना आपण प्राणी म्हणत नसू.

लाकूडफाट्याशिवाय
तुम्हाला जंगलातून मिळते काय?
मिळते कुणाचे तरी घरदार,
जर त्यांना आपण जंगल म्हणत नसू.

पाण्याशिवाय
तुम्हाला नद्यांपासून मिळते काय?
मिळतात कैक संस्कृतींची पाळेमुळे
जर आम्ही सुसंस्कृतपणे बोलत असू.

मातीशिवाय
तुम्हाला जमिनीतून मिळते काय?
मिळते निसर्गाचे सार,
जर त्यांना आम्ही माती म्हणत नसू.

दहशतीव्यतिरिक्त
तुम्हाला नक्षलवाद्यांकडून मिळते काय?
मिळतो हक्कांसाठी लढण्याचा अधिकार
जर त्यांना आम्ही नक्षली म्हणत नसू.

उपद्रवाशिवाय
तुम्हाला या व्यक्तींकडून मिळते तरी काय?
मिळतात संपूर्ण क्रांतीचे तुषार,
जर त्यांना आपण फक्त एक व्यक्ती
न संबोधू.

आता मी विचारू?

सोन्याशिवाय
खाणींमधून तुम्हाला मिळते काय?
मिळतो तुमच्या झोपी गेलेल्या आत्म्याचा पत्ता,
जर तुम्ही बंड न कराल.

आम्हाला गुलाम बनविण्याशिवाय
तुम्हाला मिळते काय?
मिळतो तुमच्या रक्तातल्या भेसळीचा ठावठिकाणा,
जर तुम्ही प्रतिकार न कराल.

आमच्या लेकीबाळींवर बलात्कार करण्याशिवाय तुम्हाला मिळते काय?
मिळतो तुमच्या जिवंतपणी मेल्याचा पत्ता,
जर तुम्ही कृती न कराल.

आमच्याशी लढण्याशिवाय
तुम्हाला मिळते काय?
मिळतो ना तुम्ही एकटे असल्याचा पत्ता,
जर तुम्ही एकत्र न राहाल.

आमच्या स्वप्नांना चिरडण्याशिवाय
तुम्हाला मिळते काय?
मिळतो तुमच्या बिरसाच्या नसण्याचा पत्ता,
जर तुम्ही आपला इतिहास विसरून जाल.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

जल,जंगल,ज़मीन और 
हमारा ज़मीर

मांस के अतिरिक्त,
तुम्हें जानवरों से मिलता है क्या?
मिलता है प्यार ,
गर उन्हें हम जानवर न कहें।

लकड़ियों के अतिरिक्त,
तुम्हें जंगलों से मिलता है क्या?
मिलता है किसी का घरबार,
गर उन्हें हम जंगल न कहें।

जल के अतिरिक्त,
तुम्हें नदियों से मिलता है क्या?
मिलते हैं कई सभ्यताओं के बुनियाद,
गर हम सभ्यता से कहें।

मिट्टी के अतिरिक्त,
तुम्हें जमीनों से मिलता है क्या?
मिलता है सृष्टि का सार,
गर उन्हें हम मिट्टी न कहें।

आतंक के अतिरिक्त,
तुम्हें नक्सलियों से मिलता है क्या?
मिलता है हक के लिए लड़ने का अधिकार
गर उन्हें हम नक्सली न कहें।

उपद्रव के अतिरिक्त,
तुम्हें इन व्यक्तियों से मिलता है क्या?
मिलती है समूल क्रांति की फुहार,
गर उन्हें हम महज़ एक व्यक्ति न कहें।

अब मैं पूछूँ???

सोने के अतिरिक्त,
खदानों से तुम्हें मिलता है क्या?
मिलता है तुम्हारे सोए हुए ज़मीर का पता,
गर तुम बग़ावत न करो।

हमें ग़ुलाम बनाने के अतिरिक्त,
तुम्हें मिलता है क्या?
मिलता है तुम्हारे खून में मिलावट का पता,
गर तुम प्रतिकार न करो।

हमारी बेटियों से बलात्कार करने के अतिरिक्त,
तुम्हें मिलता है क्या?
मिलता है तुम्हारे जीते जी मर जाने का पता,
गर तुम हरक़त न करो।

हमसे लड़ने के अतिरिक्त,
तुम्हें मिलता है क्या?
मिलता है तुम्हारे अकेले होने का पता,
गर तुम इकट्ठे न रहो।

हमारे सपनों को कुचलने के अतिरिक्त,
तुम्हें मिलता है क्या?
मिलता है तुम्हारे बिरसा के न होने का पता,
गर तुम अपना इतिहास भूल जाओ।

©बच्चा लाल 'उन्मेष'
Bachcha Lal Unmesh 

('कौन जात हो भाई'- कविता संग्रह से )
                             
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने