कवीचा कबुलीनामा

कवीचा कबुलीनामा

कवीचा कबूलीनामा

आम्ही हरलो
नंतर आम्ही पराभवावर कविता लिहिली

आम्ही अन्याय पाहिला/ऐकला
सहन केला
मग सहन करण्यावर कविता लिहिली!

आम्हाला बोलायचं होतं
पण गप्प राहिलो
नंतर या गप्प राहाण्यावर 
कविता लिहिली!

आम्हाला बोलायचं/लढायचं
लढणार्‍या लोकांबरोबर चालायचं होतं
पण निष्क्रिय राहिलो
आणि आपल्या निष्क्रियतेवरती कविता लिहिली!

आम्ही दरवेळेस प्रार्थना केली
की आणखी लिहावे लागू नये

पण काही करण्या/ करु 
शकण्याच्या
बाबतीत 
आम्ही खूप खूप दुर्बल निघालो
त्यामुळे पुनःपून्हा हरलो
पुन्हा पुन्हा 
पराभवावर कविता लिहिली

आम्ही शिळ्या संस्कृतीचे 
अग्रदूतच राहिलो
भविष्याने आम्हाला नाकारावे!

मूळ हिंदी कविता
मोहन कुमार नागर
Mohan Kumar Nagar

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने