बागेतल्या नळामधून
पाण्याचे
एक एक थेंब ठिबकत आहेत
इवल्या इवल्या चिमण्या येतात
आणि नळाला लोंबकळून
ठिबकणार्या थेंबांना चोचीत झेलतात
नळ जर नीट असता
तर पाण्यावरचा चिमण्यांचा
हक्क संपून जाता
उन्हातान्हात त्या तहानेने व्याकूळ
होऊन फिरल्या असत्या
काही मरुन पण गेल्या असत्या
माणसांना नसली तरी
वस्तुंना जगाची काळजी आहे
वस्तुंचे असे नादुरूस्त असणे
त्यांचे जिवंत असणे होय.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
फ़िक्र
पार्क में लगे नल से
पानी की
एक एक बूँद गिर रही है
छोटी छोटी चिड़ियाँ आती हैं
और नल से लटक
गिरती बूँदों को उठा लेती हैं
नल अगर ठीक होता
तो पानी पर चिड़ियों का
अधिकार खत्म हो जाता
धूप में वे मारी मारी फिरतीं
प्यास से बेदम
कुछ मर जातीं
इंसानों को न सही
चीज़ों को दुनिया की फ़िक्र है
चीज़ों का यूँ ख़राब होना
उनका ज़िंदा होना है।
©संजीव कौशल
Sanjeev Kaushal