प्रेरणा आमुची युगायुगाची!

प्रेरणा आमुची युगायुगाची!

प्रेरणा आमुची युगायुगाची!
🚩

का करीशी बा आरती
शिवबा दैवी अवतार नव्हे
पुत्र कणखर सह्याद्रीचा
तो,थोतांडाचा बाजार नव्हे

माता जिजाई पिता शहाजी
शककर्ता ज्यांनी घडविला
गुलामीचा अंधार संपला
स्वातंत्र्याचा सूर्य उगवला

भटीपाशाचा कपटी पंजा
तरिही बहूजनांना नाडतो
जित्याजागत्या माणसांचे
पराक्रम मोडीत काढतो

देव आणि धर्म म्हणजे
गुलामगिरीचा जुना सापळा
छत्रपतींना तयात कोंडून
मावळ्यांच्या मुसक्या आवळा

लखलाभ तुम्हांला कर्मकांडे 
यज्ञयाग आणि पूजाअर्चना
कुळवाडीभूषण राजा माझा
तुमच्या पोथीपंचांगात मावेना

पुराणातल्या कथा काल्पनिक
तुम्हीच करावीत पारायणे ती
पराक्रमगाथा जिती-जागती
अजूनी मिरवते मराठी माती

साचेबद्ध चार प्रचारपटांनी
कशी भटाळेल रे शिवगाथा?
फक्त स्मरणे रक्त उसळते
उन्नत होतो आमचा माथा!

नको आरती नको अभिषेक
थाप नको ती अवताराची
शिवछत्रपतींचा देह मानवी
प्रेरणा आमुची युगायुगाची!
🚩
                    -भरत यादव
              Bharat Yadav
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने