उद्याची चिंता

उद्याची चिंता


उद्याची चिंता

आरोपीच्या पिंजर्‍यात उभ्या असलेल्या
साॅक्रेटिसला जेव्हा विष पिण्याचा हुकूम सुनावला जात होता तेव्हा काही समजूतदार लोकांनी न्यायमुर्तींना समजावले की,
'हे ठिक नाहीये,
यामुळे न्यायावरचा लोकांचा विश्वास उडून जाईल'

न्यायाधिशांचा युक्तीवाद असा होता,
'आम्हांला नागव्या राजाच्या अब्रूचे
कुठल्याही स्थितीत रक्षण करायचे आहे,हाच आजचा कायदा आहे.
आम्हांला उद्याची नाही,
आजची चिंता आहे.'

न्यायाधिशांची आडमुठी भूमिका ऐकून समजुतदार लोक साॅक्रेटिसकडे बघू लागले,
जो न्यायाधीशांच्या डोळ्यात डोळे घालून विषाच्या प्याल्याची वाट पाहात होता.

'तुझ्यापुढे अजून संपूर्ण आयुष्य पडले आहे,
तुला आणखी खूप काही करायचे आहे'
'माफी मागून घे,काय फरक पडतो'
साॅक्रेटिसच्या कानात ते कुजबुजले.

साॅक्रेटिस विषाचा प्याला हातात घेत 
मंद स्मित करत बोलला,
'मला आजची नाही,
उद्याची चिंता आहे.
मला भविष्याची काळजी आहे...'

असे बोलून साॅक्रेटिसने एका दमातच
प्याला पिऊन टाकला!

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता
कटघरे में खड़े सुकरात को 
जब ज़हर पिलाने का आदेश दिया जा रहा था
तो कई 'समझदार' लोगों ने न्यायधीशों को समझाया
'यह ठीक नहीं है,
इससे न्याय पर  लोगों का विश्वास उठ जाएगा'.

न्यायधीशों का तर्क था,
हमे नंगे राजा की इज़्ज़त की हर हाल में रक्षा करनी है
यही आज का कानून है.
हमे कल की नहीं, आज की चिंता है,

न्यायाधीशों का अड़ियल रुख देखकर
'समझदार' लोग सुकरात की ओर मुखातिब हुए
जो न्यायधीशों की आंखों में घूरते हुए
ज़हर के प्याले का इंतजार कर रहा था.

'तुम्हारे सामने अभी पूरी जिंदगी पड़ी है
तुम्हें अभी बहुत कुछ करना है'
'माफ़ी मांग लो, क्या फ़र्क पड़ता है'
 सुकरात के कान में वे फुसफुसाये.

सुकरात ज़हर के प्याले को हाथ में लेते हुए
हौले से मुस्कुराया,
'मुझे आज की नहीं, कल की चिंता है.
मुझे भविष्य की चिंता है...'

यह कहकर सुकरात ने एक बार में ही प्याला गटक लिया!

©मनीष आज़ाद
Manish Azad
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने