ना साडी, ना अंबाडा ना गोंदणं,ना दागिना
काहीच तर नेसत नाहीस मग कशी काय बरं तू
आदिवासी?
बर्याचवेळा लोक विचारत असतात मला
पण मी त्यांना सांगू इच्छिते
धरतीच्या जवळ राहणंच आदिवासी असणं होय
निसर्गासोबत चालणंच आदिवासी असणं होय
नदीप्रमाणं वाहाणं आणि अनौपचारिक राहाणंच आदिवासी असणं होय
आतून आणि बाहेरून प्रत्येक बंधनाविरूद्ध लढणंच आदिवासी असणं होय आणि आपल्या सुंदर
असण्याच्या सर्व चिन्हांसह अधिक मनुष्य असणंच आदिवासी असणं होय
पण कुणाच्या मनात फक्त राहिलेलं असेल
कुठलातरी दागिना,गोंदवणं आणि कुणी नाही समजू
शकत असेल काय असतं आदिवासी असणं
तर माझी अशी इच्छा आहे की बदलत्या काळात नव्यानं
प्रतिकांमध्ये फसलेल्या प्रत्येक भ्रमाला तोडून टाकणं
याच आदिवासीपणाबरोबर
शिल्लक राहू शकतं धरतीवर एखाद्याचं आदिवासी असणं.
मूळ हिंदी कविता
जसिंता केरकेट्टा
Jacinta Kerketta
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav