मोडके-तोडके फटके

मोडके-तोडके फटके

मोडके-तोडके फटके!

अ-न्यायाचा लळितकाळ
देशामध्ये सरपटताना
मुस्लिम-दलित-आदिवासी
आळीपाळीने मारताना

सर्वसत्ताधीश मनुवादी
संविधान कुरतडताना
कपट कारस्थानांनी
लोकशाही चिरडताना

सत्तालोलुप लाचारांना
धर्मांधतेत लोळवताना
जनताभिमुख धोरणांना
जाहीर लकवा मारताना

सवर्णमयी राष्ट्रवादाचे
मनुस्वप्न साकारताना
शोषित पिडित उपेक्षित
खिजगणतीत नसताना

विविधतेची बाग अशी
उद्धवस्त होत असताना
कट्टरतावादाच्या जाळ्यात
जो तो अडकत असताना

बलात्कारी उजळ माथ्याने
समाजात वावरताना
आयाबहिणींची इज्जत-अब्रू
खुर्चीखाली तडफडताना

उन्मादातून धर्मांधता
सहज उगम पावताना
निकोप सुंदर लोकशाहीचे
संविधानस्वप्न भंगताना!

                 -भरत यादव
           Bharat Yadav
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने