सोबत घेऊन चालणे वेगळी गोष्ट आहे
हातात हात घेऊन चालणे वेगळी गोष्ट आहे
नदीच्या दोन टोकांवर उभ्या असलेल्या
दोन्ही लोकांचा हात धरून चालणे
नदीच्या रूंदीपेक्षा
हृदयांमधल्या अंतराने ठरत असते
मेंदूत एकाचवेळी राहाणारे मनु
आणि बाबासाहेब आंबेडकर
काय हृदयात ठेवले जाऊ
शकतात एकत्र कधी?
एका स्त्रीच्या मनात
द्वंद्व करणार्या परंपरा
आणि सिमोनचे पुस्तक
काय विचारांमधून बाहेर पडून
व्यवहारात अंमलात आणले जाऊ शकते एकत्रितपणे?
अशी कोणती जीभ आहे महाराज!
जी गांधीजींचे नाव घेऊन युद्धासाठी आव्हान करते आहे
असे कुठले हात आहेत
जे दंगलखोरांच्या काठ्यांना तिरंगा डकवत आहेत
अशी कुठली माणुसकी आहे
जी माणसाला धर्मावरून ओळखते
अशी कुठली हास्यकला आहे
जिला केवळ टवाळकी करणेच ठाऊक आहे?
संविधान बदलल्याशिवाय
कायदे कसे बदलले जातायत
समानतेच्या कक्षेत कसे बांधले
जात आहे स्वातंत्र्य
विषोत्पादन करणार्या युगाला
कसे सिद्ध केले जाते आहे
अमृतकाळ म्हणून?
हे समजण्यासाठी बंद खोल्यांमधली चर्चासत्रं नव्हे
फक्त या प्रक्रियेच्या सुक्ष्मतंतूंचे आकलन गरजेचे आहे
की 'साथीदारा हात दे' ची
लोकधून कशी बदलली?
'सर्वांची साथ सर्वांचा विकास' च्या सरकारी घोषणेत!
राजकारणाचे लांबलचक तत्वज्ञान मला माहित नाही
दीर्घ युक्तीवादात आम्ही दुर्बल आहोत
तुझ्या वाक्चातुर्याच्या नकारात जन्मलेले
एवढेसे वाक्य हाच
माझा युक्तीवाद आहे
की संविधान आणि कायदा यातला फरक खरेतर
हात आणि सोबत यातला फरक आहे.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
हाथ और साथ का फर्क
साथ लेकर चलना अलग बात है
हाथ में हाथ लेकर चलना अलग बात
नदी के दो छोरो पर खड़े
दो लोगों का हाथ पकड़कर चलना
नदी की चौड़ाई से ज्यादा
दिलों के फासले से तय होता है
दिमाग में एक साथ रहने वाले मनु और अंबेडकर
क्या दिल में रखे जा सकते हैं एक साथ
एक नारी की चेतना में
द्वंद्व करने वाली परंपराएं और सिमोन की किताब
क्या विचारों से निकलकर
व्यवहार में निभाई जा सकती हैं एक साथ
वह कौन सी ज़बान है ज़िल्ले इलाही
जो गांधी का नाम लेकर युद्ध का आह्वान करती है
वह कौन से हाथ हैं
जो दंगाइयों के डंडों में तिरंगा बांधते हैं
वह कौन सी अदमीयत है
जो आदमी को मजहब से पहचानती है
हास्य की वह कौन सी कला है
जो सिर्फ खिल्ली उड़ाना जानती है
संविधान को बदले बिना कानून कैसे बदल जाते हैं
समानता के दायरे में कैसे बांधी जाती है स्वतंत्रता
विषोत्पादन के युग को कैसे साबित किया जाता है अमृतकाल
यह समझने के लिए बंद कमरों की गोष्ठियां नही
सिर्फ इस प्रक्रिया के महीन तंतुओं की समझ जरूरी है
कि साथी हाथ बढ़ाना की लोक धुन कैसे बदली
सबका साथ सबका विकास के सरकारी जुमलों में
सियासत के लंबे फलसफे मुझे नही मालूम
लंबी तकरीरों में हाथ तंग है अपना
तुम्हारी वाकपटुता के नकार में जन्मा
इतना सा वाक्य ही मेरा तर्क है
कि संविधान और कानून का फर्क
दरअसल हाथ और साथ का फर्क है
©जावेद आलम ख़ान
Javed Alam Khan