सत्यशोधकी अभंग

सत्यशोधकी अभंग

सत्यशोधकी अभंग!
🚩
धर्म आणि जात
श्रेष्ठ मानताती
दुष्ट मनोवृत्ती
फोफावली

माणसाला नाही
काडीचा सन्मान
मनुस्मृती घाण
साचलेली

शोषण सापळे
उभे जागोजागी
धर्मखोर ढोंगी
सत्तास्थानी

कुठले स्वातंत्र्य?
कसला उत्सव?
अत्याचार पर्व
संपेचि ना

आता घुबडतोंडे
कुठे ती लपली?
म्हणती संपली
जातीयता

दगडधोंड्यांनी
मंदिरे भरली
माणुसकी मेली
देशातली

जात कर्तृत्वाची
थांबवू बढाई
हरलो लढाई
समतेची

आम्ही भारताचे
लोक बा संयमी
संविधानधर्मी
होऊ चला
🚩
   -भरत यादव
Bharat Yadav
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने