एक आदिवासी गाणं

एक आदिवासी गाणं

एक आदिवासी गाणं

गाव सोडायचं नाय रं
जंगल सोडायचं नाय रं
मातीमाय सोडायची नाय
ही लढाई सोडायची नाय रं

धरणं बांधती,
गावं बुडवती
कारखाना उभारत जाती
जंगल कापती,खाणी खणती
सेंक्चुरी बनवत जाती
जल-जंगल-जमीन सोडून
आम्ही जायचं कुठं आता
विकासाच्या देवा सांग,
आमचा जीव वाचवायचा 
कसा काय रं।

यमुना आटली नर्मदा आटली
आटली सुवर्णरेखा
गंगा बनली गटारगंगा
कृष्णा पडली काळी
तुम्ही प्याल रं पेप्सी कोला
आन्  बिस्लेरीचं पाणी
तहान भागायची कशी आमची
गटारीचं पाणी पिऊन होय रं।

पूर्वज होते का मूढ ज्यांनी 
वाचवली ही जंगलं
धरती हिरवी ठेवली 
नद्या सळ सळ वाहत्या
वासनेनं तुझ्या जळली धरा 
हिरवाईही संपली
मत्स्यसंपत्ती मेली
पाखरं उडाली कुण्या देशी काय रं

मंत्री झालेत कंपनी दलाल 
जमीन हिरावली आमची
त्यांना वाचविण्या आले घेऊन
सोबत सशस्त्र पलटणी
होय अधिकारी बनलेत राजा
आणि कंत्राटदार तर मालक
गाव आमुचं जणू त्यांची
व्यापारी वसाहत हाय रं।

बिरसा आबा सांगे तळमळून
एक व्हा रं 
सोडा मौन हे आता
मच्छीमार या...दलितांनो या
या रे सारे आदिवासी
शेत-शिवारातून जागे व्हा रं
नगारा दुमदुमू द्या
रणशिंग फुंकल्याविण आता 
इलाज उरला नाय रं
देशबांधवांनो ऐकाल काय रं।

मूळ कवी
भगवानदास माजी
Bhagwandas Maji

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने