मला थांबायचं आहे भटा!
मी तुझ्यासारखा होऊ इच्छित नाही
श्रेष्ठत्वगंडाचे हे वेड
माझ्याकडून माझे माणूसपण ना हिरावून घेवो
मी राहू इच्छितो त्या सर्वांमध्ये
ज्यांना तू कधी माणूस मानलेच नाहीस
मला थांबायचं आहे भटा!
मी तुझ्यासारखा होऊ इच्छित नाही
हे तुळसीदळाचे महात्म्य
न जाणो मला पक्षपाती न बनवो
मी राहू इच्छितो त्यांच्यामध्ये,
कडूनिंबाच्या पानांसारखा
ज्यांना तू आजवर डसत आलायस,
आपल्या गोड बोलण्याने
मला थांबायचं आहे भटा!
मी तुझ्यासारखा होऊ इच्छित नाही
हा मोक्षाचा अनुभव
न जाणो माझी भूमी ना हिरावून घेवो
मी पाहू इच्छितो सृष्टीच्या अंतापर्यंत
तुझ्या या वेडाचाराच्या परिसीमांना
मला थांबायचं आहे भटा!
मी तुझ्यासारखा होऊ इच्छित नाही
हे दिवसभर बसून प्रवचन झाडणं
न जाणो माझी क्रयशक्तीच हिरावून न घेवो
मी राहू इच्छितो त्या सर्वांमध्ये
ज्यांच्या वाट्याला श्रम तर आले
पण भाकर नाही
मला थांबायचं आहे भटा!
मी तुझ्यासारखा होऊ इच्छित नाही
ही मनुव्यवस्थेतील एकतर्फी सवलत
न जाणो माझे न्यायपूर्ण चरित्रच ना हिरावून घेवो
मी अढळ राहू इच्छितो
संविधानाच्या प्रस्तावनेत
ज्यात तू ही देव राहात नाही आणि
होऊन जातोस माणूस
मला थांबायचं आहे भटा!
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
मुझे रुक जाना है ब्राह्मण!
मुझे रुक जाना है ब्राह्मण!मैं तुम सा नहीं बनना चाहता..
श्रेष्ठता का ये बोध
कहीं मुझसे मेरी मनुष्यता न छीन ले।
मैं रहना चाहता हूँ उन सबके बीच
जिन्हें तुमने कभी मनुष्य समझा ही नहीं।
मुझे रुक जाना है ब्राह्मण!मैं तुम सा नहीं बनना चाहता..
ये तुलसी दल की महिमा
कहीं मुझे पक्षपाती न बना दे
मैं रहना चाहता हूँ उनके बीच,नीम के पत्तों जैसा
जिन्हें तुम अब तक डसते आए,अपनी मधुर वाणी से।
मुझे रुक जाना है ब्राह्मण!मैं तुम सा नहीं बनना चाहता..
ये मोक्ष वाला अनुभव
कहीं मुझसे मेरी धरती न छीन ले
मैं देखना चाहता हूँ कायनात के अंत तक
तुम्हारे इन पागलपन की हदों को।
मुझे रुक जाना है ब्राह्मण!मैं तुम सा नहीं बनना चाहता..
ये दिन भर बैठे प्रवचन झाडना
कहीं मुझसे मेरी कार्य शक्ति ही न छीन ले
मैं रहना चाहता हूँ उन सबके बीच
जिनके हिस्से में मेहनत तो आई पर रोटी नहीं
मुझे रुक जाना है ब्राह्मण!मैं तुम सा नहीं बनना चाहता..
ये मनु व्यवस्था में एकतरफा रियायत
कहीं मेरा न्यायिक चरित्र ही न छीन ले
मैं बने रहना चाहता हूँ संविधान की प्रस्तावना में
जिसमें तुम भी देवता नहीं रह जाते और हो जाते हो मनुष्य
मुझे रुक जाना है ब्राह्मण!मैं तुम सा नहीं बनना चाहता..
©बच्चा लाल 'उन्मेष'
Bachcha Lal Unmesh