संस्कारी नव्हता
बलात्कारीदेखील कुणापेक्षा कमी संस्कारी नव्हता
हे मला तेव्हा ठाऊक झाले
जेव्हा तो तुरूंगातून सुटून आला होता
आणि त्याला फुलांचे हार घातले गेले
चहूबाजूंनी असलेल्या कॅमेर्याच्या समोर
बलात्कारीही खूप प्रामाणिक होता
हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेले
जेव्हा त्याने कुणाचे तरी पाकिट मारले
आणि यासाठी त्याला एका समारंभात सन्मानित केले गेले
बलात्कारीही खूप दयाळू होता
याचा पुरावा मला तेव्हा मिळाला जेव्हा त्याच्या सज्जनपणाच्या बातम्या छापून आल्या वर्तमानपत्रांमध्ये
बलात्कारी कुठूनही बलात्कारी नव्हता
तो तर एक संत होता
तत्ववेत्ता होता
त्याच्या आश्रमात जाऊन बघा
कितीक विद्वतजन बसलेले असतात
आता
बलात्कार्याची प्रतिभा
दुर्लक्षित न राहो
त्याच्या योगदानाचे मूल्यांकन
केले जावे
त्याचा फोटो लावला जावा
त्याच्या स्तुतीपर लिहिली
जावीत पुस्तके
त्याचे स्तुतीगान गायले जावे
सांगितले जात आहे
आता बलात्कारी तर
सात्विक व्यक्ती आहे
तो स्त्रियांकडे खूप सन्मानाने
खूपच आदरयुक्त नजरेने पाहतो
ज्या कुणीही त्याच्यावर केलेत आरोप
ती स्त्री नक्कीच मानसिकदृष्ट्या विक्षिप्त असली पाहिजे!
बलात्कारी देखील संस्कारी होता
बलात्कार केल्यानंतर
तो मंदिरात गेला
त्याने मंत्रोच्चारण केले
धूप-उदबत्ती जाळली त्याने
शेवटी त्याने मंदिरातल्या
घंटा जोरजोराने वाजवल्या
त्यानंतर हर हर महादेव म्हणत
तो निघून गेला.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
बलात्कारी भी किसी से कम संस्कारी नहीं था
बलात्कारी भी किसी से कम
संस्कारी नहीं था
यह मुझे तब पता चला
जब वह जेल से छूट कर आया था
और उसको फूल मालाएं पहनाई गई
चारों तरफ लगे कैमरे के सामने
बलात्कारी भी बहुत ईमानदार था
यह मैंने अपनी आंखों से देखा
जब उसने किसी का बटुआ मार लिया
और उसे एक समारोह में सम्मानित किया गया इसके लिए
बलात्कारी भी बहुत दयावान था
इस बात का सबूत मुझे तब मिला जब उसके नेक दिल होने की खबरें छपी अखबारों में
बलात्कारी कहीं से बलात्कारी नहीं था
वह तो एक संत था
दार्शनिक था
उसके आश्रम में
जाकर देखो
कितने विद्वतजन बैठे रहते हैं
अब
बलात्कारी की प्रतिभा अलक्षित न रहे
उसके अवदान का मूल्यांकन किया जाए
उसकी प्रतिमा लगाई जाए
उसकी तारीफ में लिखी जाएं किताबें
उसका प्रशस्ति गान किया जाए
बताया जा रहा है
अब बलात्कारी तो सात्विक
व्यक्ति है
वह स्त्रियों को बहुत सम्मान
बहुत आदर की दृष्टि से देखता है
जिस किसी ने उस पर लगाया आरोप
वह स्त्री जरूर मानसिक रूप से विक्षिप्त रही होगी!
बलात्कारी भी संस्कारी था
बलात्कार करने के बाद
वह मंदिर गया
मंत्रोच्चार किया
धूप अगरबत्ती जलाई उसने
अंत में उसने जोरों से मंदिर की घण्टियाँ बजाई
फिर हर हर महादेव करता हुआ वह निकल गया
©विमल कुमार
Vimal Kumar